क्रेडिट कार्ड आधुनिक पेमेंट प्रणालीचा एक महत्त्वाचा भाग आहेत. क्रेडिट कार्ड वापरण्याच्या काही समस्या आहेत, परंतु जे लोक क्रेडिट कार्ड वापरतात, त्यांना त्याचे फायदे (benefits of credit card) देखील समजतात. क्रेडिट कार्ड असणे कधीकधी खूप उपयुक्त ठरते. पण तुम्हाला माहित आहे का की क्रिप्टोकरन्सी इकोसिस्टममध्ये क्रिप्टोकरन्सी क्रेडिट कार्ड देखील सुरू करण्यात आले आहेत? क्रिप्टोकरन्सी क्रेडिट कार्ड देखील पारंपारिक क्रेडिट कार्डांप्रमाणेच कार्य करतात. परंतु एक मोठा फरक असा आहे की कार्डधारक पेमेंट देखील क्रिप्टोकरन्सीमध्ये करतो आणि त्याला रिवॉर्डसुद्धा (Rewards) फक्त क्रिप्टोमध्ये मिळतात. चला आज ते समजून घेऊया. (What exactly is a crypto credit card? Know whether to take it or not)
क्रिप्टो क्रेडिट कार्ड नियमित क्रेडिट कार्डांसारखेच असतात, परंतु सर्व काही क्रिप्टोमध्ये असते. क्रिप्टो जगात क्रिप्टो डेबिट कार्ड देखील आहेत. परंतु क्रिप्टो डेबिट कार्डच्या विपरीत, क्रिप्टो क्रेडिट कार्ड तुम्हाला कार्ड जारीकर्त्याकडून कर्ज घेण्याची आणि नंतर परतफेड करण्याची परवानगी देते, तेही अगदी सामान्य क्रेडिट कार्डप्रमाणे. परंतु हे सर्व व्यवहार क्रिप्टोकरन्सीमध्ये केले जातात.
वेगवेगळी क्रिप्टो कार्ड वेगवेगळी रिवॉर्ड्स देतात. Gemini क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना बिटकॉइन्समध्ये 3% पर्यंत रिवॉर्ड्स देते, जे वापरकर्त्याच्या जेमिनी खात्यात त्वरित जमा केले जातात. ब्लॉकफाय (BlockFi) क्रेडिट कार्ड असलेले वापरकर्ते 10 प्रकारच्या क्रिप्टोकरन्सीमध्ये 1.5% पर्यंत कॅशबॅक मिळवू शकतात.
SoFi क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना जे रिवॉर्ड पॉइंट मिळतात, ते बिटकॉइन (Bitcoin) किंवा इथरियममध्येन (Ethereum) रिडीम केले जाऊ शकतात. Venmo क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना कॅशबॅक मिळतो, ज्यामधून ते Bitcoin, Ethereum, Litecoin किंवा Bitcoin खरेदी करू शकतात. Brex एक बिजनेस कार्ड आहे, ज्यामध्ये वापरकर्त्याला बिटकॉइन किंवा इथरियमवर रिवॉर्ड पॉइंट मिळतात.
क्रिप्टो क्रेडिट कार्ड देखील सामान्य क्रेडिट कार्डांसारखेच असतात आणि ते वापरताना, सामान्य क्रेडिट कार्ड वापरताना घ्यावयाची सर्व खबरदारी घ्यायला हवी. म्हणजेच क्रेडिट कार्डवर पूर्णपणे अवलंबून राहू नये. पेमेंट वेळेवर करावे, अन्यथा व्याजदर आणि विलंब शुल्काचा बोजा वाढू शकतो. ही कार्ड तुमच्या क्रेडिट स्कोअरवरही परिणाम करू शकतात. यामध्ये तुम्हाला वार्षिक शुल्क देखील भरावे लागेल, त्यामुळे तुम्ही क्रिप्टो कार्डची संपूर्ण प्रणाली, तुमची गरज आणि फायदा लक्षात घेऊनच ते घ्यावे. अन्यथा, जर तुम्ही क्रिप्टो रिवॉर्ड्सवर लक्ष केंद्रित केले, परंतु क्रिप्टो क्रेडिट्सवर नाही, तर तुमचे नुकसान होऊ शकते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.