Google कडे आहे तुमची सगळी कुंडली! कळलं तर डोक्याला लावाल हात

घरच्यांपेक्षाही जास्त माहिती गुगलला.
Google
GoogleTeam eSakal
Updated on

Google...आज प्रत्येकजण गुगलशी जोडलेला आहे. त्यामुळे आपला भरपूर मोठा डेटा (Goofle Data) गुगलकडे असतो. तुम्ही Google च्या वेगवेगळ्या सुविधांचा वापर करत आहात, म्हणजेच तुम्ही गुगलला तुमच्याबद्दलचा सर्व डेटा गोळा करण्याचे अधिकार दिलेले आहेत. तसंच आणखी खोलात जाऊन विचार केल्यास तुम्ही गुगलच्या वेगवेगळ्या सुविधांचा वापर करत नसाल, तरीही गुगलकडे तुमचा डेटा असतो. तर या डेटामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असतो, हे आपण जाणून घेऊ.

Google
फेब्रुवारीत भारतात लॉंच होतील 'हे' स्मार्टफोन, पाहा डिटेल्स

गुगलच्या दाव्यानुसार, प्रत्येक Gmail वापरणाऱ्या व्यक्तीला गुगलकडे असणाऱ्या डेटाची माहिती मिळू शकते. या डेटामध्ये तुमच्या बहुतांश गोष्टींचा समावेश होतो. ज्यामध्ये, तुम्ही गुगलवर काय शोधता, आतापर्यंत तुम्ही गुगलवर काय काय शोधलं आहे. गुगल व्यतिरिक्त तुम्ही काय पाहत आहात, यूट्यूबवर काय शोधत आहात या सर्व गोष्टी गुगलकडे असतात.

लोकेशनपासून ते अॅप्सच्या डेटापर्यंत...

तुम्ही कुठे जातात, कुठे राहता, तुमच्या फोनमधील मोबाईल नंबर, कोणते अॅप्स वापरतात, तुम्ही कोणत्या वेबसाइटला भेट देतात ही सर्व माहिती गुगलकडे असते. तसंच तुमच्या संपूर्ण लोकेशन हिस्ट्रीचा डेटाही गुगलवर सेव्ह केला जातो. महत्वाचं म्हणजे तुम्ही ते तपासू देखील शकता.

  1. Google Assistant ला कोणते प्रश्न विचारले आहेत? तुम्ही आतापर्यंत यूट्यूबवर किती कमेंट केल्या आहेत?

  2. लोकेशन ट्रॅकिंगबद्दल विचार केल्यास, तुम्ही कोणत्या ठिकाणी किती वेळ घालवत आहात? किती पावलं चालतात? ही सर्व माहिती गुगलकडे असते.

  3. तुम्ही तुमच्या फोनवरील अॅप्सवर किती वेळ घालवत आहात हे देखील Google ला माहिती असतं. Google Calendar कडे तुमच्या सर्व इव्हेंट्स बद्दलचीही माहिती असते.

  4. बहुतेक लोक ईमेल आयडी आणि पासवर्ड ऑटोफिल करून ठेवतात. तसंच काहीजण Google क्रेडिट कार्डचा पासवर्ड देखी सेव्ह करतात, म्हणजेच तुमचा हा डेटा देखील Google कडे सेव्ह केला जातो.

Google
स्मार्टफोनमध्ये रिमूव्हेबल बॅटरी का नसते? जाणून घ्या कारण

Google कडे असलेला तुमचा डेटा कसा जाणून घ्याल ?

  • सर्वात आधी, तुमच्या Gmail वर लॉग इन करा. Google अकाऊंटवर जा.

  • त्यानंतर तुम्ही कॉम्प्युटरवरून लॉग इन केलं असेल तर उजव्या बाजूला तुम्हाला Data and Privacy चा पर्याय दिसेल. तिथे क्लिक करा.

  • आता तुम्हाला एक लीस्ट दिसेल. ज्यामध्ये Things that you've done and places where you've been. सारखे काही पर्याय दिसतील.

  • तुम्ही खाली स्क्रोल केल्यास, तुमचा सर्व डेटा इथे उपलब्ध असल्याचं तुम्हाला आढळेल. उदाहरणार्थ, तुम्ही पहिला पर्याय निवडा. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला My Activity चा पर्याय मिळेल.

  • इथे तुम्हाला मॅप, टाइमलाइन आणि YouTube ची सर्च हिस्ट्री पाहता येईल. याच ठिकाणी तुम्हाला इतर गोष्टी देखील जाणून घेता येईल.

Google
व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना झटका, आता चॅट बॅकअपसाठी द्यावे लागणार पैसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.