Mini Air Conditioner : उन्हाळ्यात घरी आणा 'हे' बजेट फ्रेंडली उपकरण

Cooling Gadget in Summer : उन्हाळ्यात गर्मीपासून सुटका मिळवण्याचा पोर्टेबल मार्ग
मिनी एअर कंडीशनर हे लहान आणि पोर्टेबल उपकरण आहे
मिनी एअर कंडीशनर हे लहान आणि पोर्टेबल उपकरण आहेesakal
Updated on

Mini AC in Summer : उन्हाळ्यात एसी किंवा कुलर खरेदी करणं थोडं आऊट ऑफ बजेट वाटत असेल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. कमी खर्चामध्ये अगदी बजेट फ्रेंडली मार्ग आहे ज्यामुळे तुम्ही उन्हाळ्यात गर्मीपासून सुटका मिळवू शकता. मिनी एअर कंडिशनर हा एक उत्तम पर्याय आहे.

पोर्टेबल असणारा हा मिनी एयर कंडिशनर सहजपणे कुठेही घेऊन जात येतो. कूलिंगसाठी तर एकदमच उपयोगी असे हे उपकरण आहे. जे तुम्ही एका खोलीसाठी वापरू शकता. सहली, छोटी पिकनिक काढत असाल तर त्या ठिकाणी देखील सहज घेऊन जाऊ शकता.

मिनी एअर कंडीशनर हे पारंपारिक एअर कंडीशनरपेक्षा लहान आणि अधिक पोर्टेबल असलेले उपकरण आहे. ते एका खोलीला थंड करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत, संपूर्ण घरासाठी नाही. मिनी एअर कंडीशनर अनेक प्रकारात येतात, ज्यात वेंटिलेशन जे थंड हवा तयार करतात आणि ते खिडकीद्वारे बाहेर टाकतात. एव्हॅपोरेटिव्ह जे हवेला थंड करण्यासाठी पाणी वापरतात. डायरेक्ट कूलिंग जे थंड करण्यासाठी फ्रीजिंग कॉइल वापरतात.

मिनी एअर कंडीशनर हे लहान आणि पोर्टेबल उपकरण आहे
Technology 2024 : Chat GPT आणतय नवीन फिचर ; आता तुमच्या फाईलचे विश्लेषण होणार चुटकीसरशी

मिनी एअर कंडीशनर कसा वापरायचा?

मिनी एअर कंडीशनर वापरणे सोपे आहे. एअर कंडीशनरला योग्य ठिकाणी ठेवा, जिथे ते थंड करू इच्छित असलेल्या खोलीत हवा फिरवू शकेल. एअर कंडीशनरला पॉवर सॉकेटमध्ये प्लग करा. एअर कंडीशनर चालू करा आणि तुमच्या इच्छित तापमानावर सेट करा. एअर कंडीशनर थंड होण्याची प्रतीक्षा करा.

मिनी एअर कंडीशनरचे अनेक फायदे आहेत. ज्यात ते लहान पोर्टेबल आणि हलके असतात, त्यामुळे ते सहजपणे एका खोलीतून दुसऱ्या खोलीत हलवता येतात. Easy to use असल्यामुळे कुणीही सहज ते वापरू शकते. पारंपारिक एअर कंडीशनरपेक्षा स्वस्त असतात. पारंपारिक एअर कंडीशनरपेक्षा कमी ऊर्जा वापरतात

मिनी एअर कंडीशनर हे लहान आणि पोर्टेबल उपकरण आहे
Sundar Pichai News : इंजिनिअर्ससाठी सुंदर पिचाई यांचे मार्गदर्शन : तंत्रज्ञानाची खोल समज गरजेची!

मिनी एअर कंडीशनर निवडताना तुमच्या गरजेनुसार तुम्हाला थंड करायची असलेली खोली किती मोठी आहे, तुमचे बजेट किती आहे या गोष्टींचा विचार करून खरेदी करू शकता. भारतात मिनी एअर कंडीशनरचे Blaupunkt, Symphony, Bajaj सारखे काही लोकप्रिय ब्रँड आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.