Group Food Ordering : जेवण ऑनलाईन ऑर्डर करताय? ग्रुप ऑर्डरिंग तुमच्या फायद्याचं,Swiggy अन् Zomatoने सांगितल कारण..

Group Ordering on Swiggy and Zomato : झोमॅटो आणि स्विगी या अग्रगण्य फूड डेलीव्हरी अॅप्सवर आलेल्या ग्रुप ऑर्डरिंग काय आहे आणि त्याचे फायदे जाणून घ्या.
Group Ordering on Swiggy and Zomato
Group Ordering on Swiggy and Zomatoesakal
Updated on

Food Order Zomato And Swiggy : पार्टीच्या वेळी किंवा घरात सगळ्यांसाठी जेवण मागवताना सर्वांची ऑर्डर एकाच ठिकाणी करणे आणि मग एकाच वेळी मागवणे आता सोपे झाले आहे. झोमॅटो आणि स्विगी या अग्रगण्य फूड डेलीव्हरी अॅप्सवर आलेल्या ग्रुप ऑर्डरिंगमुळे पार्टीची तयारी आता आणखी सोयीस्कर होणार आहे.

ग्रुप ऑर्डरिंग म्हणजे काय?

आता झोमॅटो आणि स्विगीवर तुम्ही तुमच्या मित्र आणि कुटुंबातील लोकांना एकाच लिंकद्वारे ऑर्डरमध्ये सहभागी करू शकता. त्यामुळे सर्वांच्या आवडी निवडीनुसार एकत्रितपणे ऑर्डर करता येईल. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पार्टीच्या वेळेस किंवा एखाद्या गेट-टुगेदरमध्ये सर्वांचा ऑर्डर वेगवेगळ्या ठिकाणी न मागवता एकाच ठिकाणी करता येतो.

Group Ordering on Swiggy and Zomato
Swiggy UPI : खुशखबर! Swiggyमध्ये आला UPI पेमेंटचा पर्याय; कसं वापराल? वाचा एका क्लिकवर

ग्रुप ऑर्डरिंग कसं करायचं?

ग्रुप ऑर्डरिंगचा फायदा घेण्यासाठी झोमॅटो किंवा स्विगीवर एका व्यक्तीने ग्रुप ऑर्डर तयार करावी लागेल. त्यानंतर त्या व्यक्तीने हा लिंक किंवा क्यूआर कोड इतर सहभागींना पाठवावा लागेल. इतर सहभागींनी हा लिंक ओपन केली किंवा क्यूआर कोड स्कॅन केला की ते देखील त्याच ऑर्डरमध्ये सहभागी होऊ शकतात.

ग्रुप ऑर्डरिंगमध्ये काय खास?

ग्रुप ऑर्डरिंगमध्ये सहभागी झालेले सर्व लोक आपापल्या आवडीचे पदार्थ निवडून ऑर्डरमध्ये जोडू शकतात. त्यामुळे सर्वांच्या आवडी निवडीचा समावेश होतो. स्विगीच्या ग्रुप ऑर्डरिंगमध्ये ऑर्डरमध्ये असलेल्या पदार्थांची एकत्रित यादी पाहण्याचा आणि त्यामध्ये बदल करण्याचा पर्याय आहे. झोमॅटोमध्ये असा पर्याय नसला तरी, ऑर्डर फायनल करण्यापूर्वी सहभागी बदल करू शकतात.

Group Ordering on Swiggy and Zomato
Zomato AI Image Remove : तुमच्यासाठी काय पण! नाराज ग्राहकांना मनवण्यासाठी Zomatoने अ‍ॅपमधून हटवलं महत्वाचं फीचर

ग्रुप ऑर्डरिंगमध्ये पेमेंट कसं करायचं?

ग्रुप ऑर्डरिंगमध्ये अंतिम पेमेंट करण्याची जबाबदारी ग्रुप ऑर्डर तयार करणाऱ्या व्यक्तीची असते. मात्र, नेहमीच्या ऑर्डरप्रमाणेच या ऑर्डरवर देखील कूपन कोड वापरता येतात. परंतु एकाच वेळी एकच कूपन कोड वापरता येतो.

कसं आहे फायदेशीर?

ग्रुप ऑर्डरिंगमुळे सर्वांची ऑर्डर एकाच ठिकाणी जमा होतो. त्यामुळे पार्टीच्या वेळी होणारा गोंधळ टाळण्यास मदत होते. तसेच, एकाच वेळी अनेक पदार्थ वेगवेगळ्या ठिकाणांहून मागवण्याऐवजी एकाच ठिकाणाहून मागवणे अधिक सोयीस्कर आणि स्वस्त पडू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.