Reliance AGM 2024 Jio Phonecall AI : जिओने नुकत्याच झालेल्या AGM 2024 मध्ये अनेक AI-आधारित सेवा लाँच केल्या. यामध्ये सर्वांसाठी आकर्षक असलेली एक खास सेवा म्हणजे Jio Phonecall AI. फोन कॉल रेकॉर्ड करणे, त्यांचे भाषांतर करणे सोपं करणारी ही अगदी नाविन्यपूर्ण सेवा आहे. चला तर जाणून घेऊया Jio Phonecall AI कसं काम करतं.
Jio Phonecall AI तुम्हाला फोन कॉल रेकॉर्ड करण्यास आणि त्यांचे वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतर करण्याची सुविधा देते. त्यामुळे ज्यांना वेगवेगळ्या भाषांमध्ये संवाद साधायचा आहे किंवा इतर भाषांमधील संभाषण समजून घ्यायचे आहे अशा लोकांसाठी ही सेवा खूप उपयुक्त ठरेल. रेकॉर्डिंग आणि भाषांतराव्यतिरिक्त, Jio Phonecall AI तुम्हाला रिअल टाइममध्ये बोलणे लिहिणामध्ये (voice to text) रुपांतरित करण्याचीही परवानगी देतो. त्यामुळे पुन्हा कॉल ऐकण्याची गरज न पडता तुम्ही महत्वाचे मुद्दे सहज आठवून ठेवू शकता. तसेच, ही नवी AI सेवा लांबगोष्टींचे सारांश तयार करेल, ज्यामुळे कोणत्याही चर्चेचे महत्वाचे मुद्दे तुम्ही लवकर समजू शकाल.
या फीचरचा वापर करण्यासाठी, कॉल दरम्यान Jio Phone Call AI नंबर 1-800-732673 जोडायची गरज आहे. नंबर जोडल्यानंतर, Jio कडून तुम्हाला स्वागत संदेश प्राप्त होईल. त्यानंतर कॉल रेकॉर्ड करण्यासाठी आणि लिहून घेण्यासाठी #1 दाबा. कॉल दरम्यान लिहिणे थांबवण्यासाठी #2 बटण दाबा आणि पुन्हा सुरु करण्यासाठी #1 पुन्हा दाबा. कॉल संपल्यानंतर, Jio Phonecall AI बंद करण्यासाठी #3 दाबा.
कॉल संपल्यानंतर, JioPhonecall AI सर्व रेकॉर्डिंग्ज, ट्रान्सक्रिप्शन्स, सारांश आणि भाषांतर Jio Cloud मध्ये जतन करेल, ज्यामुळे ते सुरक्षित आणि नेहमी उपलब्ध राहतील.
महत्वाची गोष्ट म्हणजे, Jio ने या फीचरमध्ये पारदर्शकता राखली आहे. तुमचा कॉल रेकॉर्ड केली जात असल्याचे इतर कॉल करणाऱ्यांना कळवले जाईल.
Jio च्या Welcome Offer चा फायदा तुम्ही घेऊ शकता. या ऑफरमध्ये 100 GB मोफत क्लाउड स्टोरेजसह गोपनीयता आणि सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. Jio Cloud सह, तुम्ही फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स आणि बरेच काही गोष्टी जतन करू शकता आणि शेअर करू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.