Leap Day : चार वर्षातून एकदाच येतो आजचा दिवस.. 'लीप' दिनानिमित्त गुगलने शेअर केलं खास डूडल!

Google Doodle Today : साधारणपणे एका वर्षात 365 दिवस असतात. मात्र, लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात. हा जादाचा दिवस म्हणजेच 29 फेब्रुवारी.
Leap Day 2024
Leap Day 2024eSakal
Updated on

Leap Day Google Doodle : '29 फेब्रुवारी' हा दिवस अगदी खास असतो. ही तारीख कॅलेंडरमध्ये पाहण्यासाठी तब्बल चार वर्षे वाट पहावी लागते. लीप वर्षात हा दिवस येत असल्यामुळे याला 'लीप दिन' म्हटलं जातं. गुगलने हा दिवस साजरा करण्यासाठी खास डूडल तयार केलं आहे.

या डूडलमध्ये दिसतंय, की एका तलावात दोन दगड आहेत, ज्यावर 28 आणि 1 असं लिहिलंय. या दोघांच्या मध्ये अचानक एक बेडूक येऊन बसतो, ज्यावर 29 असं लिहिलंय. दोन दगडांवरील अंक हे 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च या तारखा दाखवतात, तर बेडूक म्हणजे 29 फेब्रुवारी आहे.

कॅलेंडरमध्ये जादाचा दिवस

साधारणपणे एका वर्षात 365 दिवस असतात. मात्र, लीप वर्षामध्ये (Leap Year) 366 दिवस असतात. हा जादाचा दिवस म्हणजेच 29 फेब्रुवारी. दर चार वर्षांनी एक लीप वर्ष येतं. 2024 हे लीप वर्ष आहे. यानंतर आता चार वर्षांनी, म्हणजेच 2028 साली पुन्हा आपल्याला कॅलेंडरमध्ये हा दिवस पहायला मिळेल.

Leap Day 2024
Leap Year: जेव्हा २९ फेब्रुवारी नव्हता तेव्हा होत्या दोन २८ फेब्रुवाऱ्या.! काय आहे २९ फेब्रुवारीचा इतिहास जाणून घ्या

कुठून येतो जादाचा दिवस?

सूर्याला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 365 दिवसांचा कालावधी लागतो हे आपण ऐकलं असेल. मात्र हा कालावधी खरंतर 365.25 दिवसांचा असतो. यामुळे दर चार वर्षांनंतर हा जादाचा वेळ मिळून एक पूर्ण दिवस गणला जातो. हाच जादाचा दिवस फेब्रुवारीमध्ये जोडला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.