Mission Divyastra : अग्नी-5 मिसाईलच्या यशस्वी चाचणीमुळे चर्चेत आलेली MIRV टेक्नॉलॉजी काय आहे? जाणून घ्या

MIRV टेक्नॉलॉजी अमेरिकेने सर्वात आधी शीतयुद्धादरम्यान (Cold War) विकसित केली होती. यामध्ये एक मिसाईल एकत्र कित्येक प्रकारची शस्त्र घेऊन जाऊ शकते.
Mission Divyastra Agni-5
Mission Divyastra Agni-5eSakal
Updated on

What is MIRV Technology : भारताने सोमवारी (11 मार्च) आपल्या न्यूक्लिअर बॅलेस्टिक मिसाइल अग्नी-5 ची यशस्वी चाचणी पार पाडली. या मिसाईलचं वैशिष्ट्य म्हणजे यातील 'मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हीकल' (MIRV) टेक्नॉलॉजी. हे तंत्रज्ञान आतापर्यंत केवळ अमेरिका, रशिया, चीन, उत्तर कोरिया आणि इस्राइलकडे उपलब्ध होतं. या देशांच्या पंक्तीत आता भारतही जाऊन बसला आहे.

MIRV टेक्नॉलॉजी अमेरिकेने सर्वात आधी शीतयुद्धादरम्यान (Cold War) विकसित केली होती. यामध्ये एक मिसाईल एकत्र कित्येक प्रकारची शस्त्र घेऊन जाऊ शकते. यासोबतच एकाच वेळी अनेक लक्ष्यांना भेदण्याची क्षमता या मिसाईलमध्ये असते. एवढंच नाही, तर या तंत्रज्ञानाचा वापर करुन बनवलेल्या मिसाईल्स रस्त्यावरुन दुसरीकडे नेता येतात. (MIRV Missiles)

MIRV टेक्नॉलॉजी कशी खास?

  • या टेक्नॉलॉजीचा वापर लांब पल्ल्याच्या मिसाईलमध्ये करण्यात येतो.

  • यामध्ये एकाच वेळी कित्येक वॉरहेड (शस्त्रे) घेऊन जाण्याची क्षमता असते.

  • प्रत्येक वॉरहेडला वेगवेगळं लक्ष्य भेदण्यासाठी प्रोग्रॅम करता येतं.

  • विविध वॉरहेडना एकाच वेळी एकच लक्ष्य भेदण्यासाठी देखील प्रोग्रॅम करता येतं.

  • एकाच मिसाईलमध्ये विविध शस्त्रं नेता येत असल्यामुळे खर्च कमी होतो.

  • अग्नी-5 मिसाईलमध्ये वापरली जाणारी MIRV टेक्नॉलॉजी ही स्वदेशी बनावटीची आहे.

Mission Divyastra Agni-5
Mission Divyastra: भारताच्या 'दिव्यास्त्र'ची यशस्वी चाचणी; PM मोदींनी ट्विट करत दिली माहिती

तीन टप्प्यांमध्ये करते काम

  • पहिल्या टप्प्यात ही मिसाईल सामान्य पद्धतीने लाँच केली जाते.

  • दुसऱ्या टप्प्यात ही मिसाईल हवेत असतानाच विविध वॉरहेड वेगळे होतात.

  • तिसऱ्या टप्प्यात प्रत्येक वॉरहेड आपल्या आपल्या टार्गेटच्या दिशेने जातं आणि त्याला नष्ट करतं.

'अग्नी-5'ची वैशिष्ट्ये

  • भारताच्या अग्नी सीरीजमध्ये 1 ते 5 अशा विविध मिसाईल्स आहेत.

  • यातील अग्नी-5 मिसाईल ही तब्बल 5 हजार किलोमीटर दूर असणारं लक्ष्य भेदू शकते.

  • या मिसाईलचं वजन 50 हजार किलो असून, याची लांबी 17.5 मीटर आहे.

  • यावर 1,500 किलो वजनाची अण्वस्त्रे लावता येऊ शकतात.

  • या मिसाईलचा वेग आवाजाच्या वेगाच्या 24 टक्के अधिक आहे. म्हणजेच एका सेकंदात ही मिसाईल तब्बल 8.16 किमी अंतर कापते.

Mission Divyastra Agni-5
Instagram Data Tracking : इन्स्टाग्रामला सगळं कळतं तुम्ही इंटरनेटवर काय पाहता; दुसऱ्या अ‍ॅप्सवरही ठेवतं लक्ष! अशा प्रकारे थांबवा ट्रॅकिंग..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.