NAMO Drone Didi Scheme : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी एआय आणि तंत्रज्ञान या विषयावर बिल गेट्स सोबत चर्चा केली होती. या चर्चेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. देशात कशा प्रकारे तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं आहे, आणि त्याचा फायदा नागरिकांना होतो आहे याबाबत पंतप्रधानांनी बिल गेट्सला माहिती दिली. यामध्येच त्यांनी 'ड्रोन दीदी' योजनेबाबत देखील माहिती दिली.
भारतातील महिला या तंत्रज्ञान वेगाने आत्मसात करत आहेत. या महिलांच्या हातात तंत्रज्ञान देण्याचा आमचा विचार आहे. नमो ड्रोन दीदीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तीन कोटी महिलांना 'लखपती दीदी' बनवण्याचं आमचं लक्ष्य असल्यांचही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं.
आपल्या देशात तंत्रज्ञानाचा वेगाने विस्तार होत आहे. यातच घरातील महिला आता चूल-मूल यामध्ये न अडकता, तंत्रज्ञानाच्या साथीने विविध प्रकारची कामं करत आहेत. ग्रामीण भागातील महिलांना ड्रोन चालवण्याच्या माध्यमातून पैसे कमावण्याची एक संधी मोदी सरकारने उपलब्ध केली आहे. या योजनेला पंतप्रधान मोदींनी 'नमो ड्रोन दीदी योजना' असं नाव दिलं आहे.
नमो ड्रोन दीदी योजने अंतर्गत महिलांना ड्रोन उडवणे, डेटा विश्लेषण आणि ड्रोनची निगा कशी राखायची याचं प्रशिक्षण दिलं जातं. शेतीच्या विविध कामांसाठी ड्रोनचा कसा वापर करता येईल याचा यात समावेश असतो. पिकाचं निरीक्षण, कीटकनाशकांची फवारणी, बियांची पेरणी अशा गोष्टींचाही यात समावेश आहे. (Namo Drone Didi Scheme)
यामध्ये महिलांना 15 दिवस ड्रोन चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. ड्रोन दीदी म्हणून काम करणाऱ्या महिलेला 15,000 रुपये पगार मिळतो. यासाठी दहा ते 15 गावांचं एक क्लस्टर बनवून त्यातून ड्रोन दीदीची निवड होते, आणि प्रशिक्षण दिलं जातं. या महिलांचा पगार हा डीबीटीच्या माध्यमातून थेट बँक खात्यावर जमा होतो.
केंद्र सरकारने ही योजना 2023 सालीच सुरू केली होती. या योजनेचं उद्दिष्ट देशातील 15,000 हून अधिक महिलांना ड्रोन दीदी बनवण्याचं आहे. यामध्ये निवड होण्यासाठीची सर्वात मोठी अट म्हणजे, ती महिला एखाद्या स्वयंसेवी समूहातील सक्रिय सदस्य असावी. यासोबतच ड्रोन दीदी बनणारी महिला भारतीय असणंही गरजेचं आहे. यासाठी वयाची अट 18 वर्षे ते 37 वर्षे आहे.
पीएम ड्रोन दीदी योजनेचा लाभ केवळ स्वयंसेवी संस्थांच्या सदस्य महिलांनाच देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित महिलेकडे पुढील कागदपत्रे असणं गरजेचं आहे -
आधार कार्ड
रहिवासी दाखला
पॅन कार्ड
स्वयंसेवी संस्थेचं ओळखपत्र
पासपोर्ट साईज फोटो
मोबाईल नंबर
ईमेल आयडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.