NFT म्हणजे काय? त्याबद्दल इतकी चर्चा का होतेय? जाणून घ्या सोप्या भाषेत

what is nft and how does it work know all details in marathi tech news
what is nft and how does it work know all details in marathi tech news
Updated on

डिजिटल जगात क्रिप्टोकरन्सी आल्यानंतर एक प्रकारची क्रांती झाली असून, त्याचवेळी, गेल्या काही दिवसांपासून NFT या एका शब्दाची खूप चर्चा होत आहे. काही NFT लाखो डॉलर्सला विकल्या जात असल्याच्या अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. आजच्या डिजिटलायझेशनच्या काळात याला खूप महत्व आले आहे. या वेगाने होत असलेल्या डिजिटायझेशनच्या युगात, जर तुम्हाला अद्याप NFT बद्दल माहिती नसेल, तर ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे. NFT म्हणजे काय आणि ते कसे काम करते ते आज आपण जाणून घेणार आहोत.

NFT म्हणजे नेमकं काय?

NFT म्हणजे नॉन फंगीबल टोकन (Non Fungible Tokens) हे क्रिप्टोग्राफिक टोकन देखील म्हटले जाऊ शकते. हे केवळ एक टोकन नाही, तर ते तुमच्यासाठी उत्पन्न आणि गुंतवणुकीचे चांगला स्रोत देखील ठरु शकतो.

NFT ही एक प्रकारची डिजिटल मालमत्ता आहे, जी ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर (Blockchain Technology) आधारित आहे. त्याच्या मदतीने तुम्ही फोटो, GIF, व्हिडिओ क्लिप, पेंटिंग आणि यासारख्या इतर डिजिटल मालमत्तांची मालकी निश्चित केली जाते. त्यानंतर त्याची खरेदी-विक्री केली जाते. NFT ची खरेदी आणि विक्री केवळ डिजिटल स्वरूपातच होते.NFTs डिजिटल संपत्तीप्रमाणे डिजिटटल आर्ट, संगीत, चित्रपट, गेम किंवा तुमच्या संग्रहात असलेल्या इतर कोणत्याही वस्तू यासारख्या डिजिटल मालमत्तांमध्ये असू शकते.

what is nft and how does it work know all details in marathi tech news
ड्रायव्हिंग लायसन्स, RC घरी विसरलात? फोन वाचवेल तुमचा दंड

NFT कशी काम करते?

सोप्या भाषेत सांगायचे तर, डिजिटल मालमत्ता NFT बनवणे म्हणजे त्याची मालकी घेणे. तुम्ही NFT खरेदी केल्यास, तुम्हाला एक टोकन दिले जाईल. हे टोकन तुम्ही त्या डिजिटल मालमत्तेचे मालक आहात याचा पुरावा असेल. म्हणजेच, तुम्ही तुमच्यानुसार ती डिजिटल मालमत्ता विकू शकता.

NFTs आणि सामान्य खरेदी आणि विक्रीमधील फरक समजून घेणे गरजेचे आहे, उदाहरणार्थ, 10 रुपयांची नोट दुसर्‍या 10 रुपयांच्या नोटेसाठी बदलली जाऊ शकते. क्रिप्टोकरन्सी देखील फंजीबल असतात. परंतु हे NFT च्या बाबतीत नाही, ज्यामुळे हे क्रिप्टोपेक्षा वेगळे ठरते. क्रिप्टोकरन्सीप्रमाणे, एनएफटी खरेदी आणि विक्रीसाठी विशेष प्लॅटफॉर्म आहेत.

एनएफटीच्या विक्रीचा अर्थ असा नाही की ज्या मालमत्तेसाठी ती टोकन दिली गेली आहे ती देखील पाठवली जाते. उदाहरणार्थ, अनेक प्रसिद्ध पेंटिंगचे NFT विकले गेले आहेत परंतु खरेदीदाराला पेंटिंग मिळाले नाही. येथे किंमत वस्तूपेक्षा NFT च्या मालकीच्या प्रमाणपत्राची अधिक आहे. हे प्रमाणपत्र डिजिटल वॉलेटमध्ये असते.

what is nft and how does it work know all details in marathi tech news
वाहनात CNG किट बसवण्यासाठी नवे नियम, 'या' गाड्यांना मिळणार परवानगी

NFTs चा वापर डिजिटल असेट्स किंवा जगात पूर्णपणे भिन्न असलेल्या गोष्टींसाठी केला जाऊ शकतो. हे त्यांची किंमत आणि विशेषता सिध्द होते. NFT च्या मदतीने, आजच्या डिजिटल युगात, कोणतीही पेंटिंग, कोणतेही पोस्टर, ऑडिओ किंवा व्हिडिओ सामान्य गोष्टींप्रमाणे खरेदी आणि विक्री करता येते. त्या बदल्यात, तुम्हाला NFTs किंवा Non-Fungible Tokens नावाचे डिजिटल टोकन्स मिळतात. आजच्या नवीन युगातील लिलावाप्रमाणे तुम्ही नॉन-फंजिबल टोकनचा विचार करू शकता. सोप्या शब्दात समजून घ्यायचे झाले तर, लोक कोणत्याही कलाकृतीला NFT करून पैसे कमवतात किंवा अशी कोणतीही गोष्ट जी जगात दुसरी नसेल.

what is nft and how does it work know all details in marathi tech news
रेल्वे स्टेशनची नावे पिवळ्या बोर्डवरच का लिहीतात? जाणून घ्या खास कारण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()