What is Nomophobia : आजकाल स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा अगदी महत्त्वाचा भाग झाला आहे. आयरनी म्हणजे तुम्ही ही बातमी देखील स्मार्टफोनवरच वाचत असाल. मोबाईलचा अति वापर घातक आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मात्र, आजकाल सगळीच कामं मोबाईलवर होत असल्यामुळे तो न वापरणं केवळ अशक्य आहे.
मोबाईलच्या अति वापरामुळे (Smartphone Addiction) कित्येक गंभीर आजारांची लागण होऊ शकते. यातीलच एक आजार म्हणजे नोमोफोबिया. नोमोफोबिया या शब्दाचा अर्थ 'नो-मोबाईल-फोबिया' असा होतो. यामध्ये एखाद्या व्यक्तीला स्मार्टफोनची एवढी सवय होऊन जाते, की त्याच्याशिवाय ती व्यक्ती राहूच शकत नाही. जवळ मोबाईल नसल्यावर जर तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल, तर तुम्हालाही या आजाराची लागण होण्याची शक्यता असू शकते असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. (Nomophobia Explained)
खिशात मोबाईल नसल्यास दचकून भीती वाटणे.
मोबाईल जवळ नसेल तर अस्वस्थ वाटणे.
इंटरनेट किंवा नेटवर्क नसल्यावर बेचैनी होणे.
दुसरं काम करतानाही मोबाईल पाहण्याची सवय असणे.
झोपताना कितीतरी वेळ मोबाईल बघत बसणे.
मोबाईलची चार्जिंग कमी झाल्यावर बेचैनी वाटणे.
खिशामध्ये मोबाईल व्हायब्रेट होतोय असं वाटणे, किंवा बसल्या बसल्या मोबाईलची रिंग वाजल्याचा भास होणे.
अशी काही लक्षणं नोमोफोबियाची सुरुवात असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. अर्थात, या गोष्टी अगदी सामान्य असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. मात्र, याचं प्रमाण किती आहे, यानुसार त्याचं गांभीर्य ओळखावं असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. (Mobile Addiction)
तुम्हालाही जर असं वाटत असेल, की आपल्याला स्मार्टफोनची खूप सवय झाली आहे; तर काही गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं आहे.
फोनचा वापर केवळ गरज असतानाच करा. ज्या कामांसाठी स्मार्टफोनची गरज भासणार नाही, ती कामे करताना फोन दूर ठेवा.
सोशल मीडिया अॅप्सवर किती वेळ व्यतीत करायचा याचं लिमिट ठरवा.
मोबाईल बाजूला ठेऊन पुस्तके वाचणे, पेंटिंग करणे किंवा इतर कोणत्याही छंदाला वेळ द्या.
मेडिटेशन किंवा योग अशा गोष्टींच्या मदतीने मोबाईलची सवय कमी करण्याचा प्रयत्न करा.
तरीही मोबाईलचं व्यसन कमी होत नाही असं वाटल्यास तज्ज्ञांची मदत घ्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.