Sunita Williams Health : अंतराळात गेल्यानंतर अंतराळवीराला होतो गंभीर आजार; स्पेस अ‍ॅनीमिया काय आहे? सुनीता विलियम्स आजाराच्या विळख्यात

Sunita Williams Health Update Space Station Anemia Desease : सुनीता विल्यम्सना अंतराळात गंभीर त्रास सुरु झाला. पृथ्वीवर परतल्यानंतर दृष्टीवर आणि हाडांच्या आरोग्यावर परिणाम होणार असल्याचे सांगितले जात आहे. अंतराळात जाणाऱ्या प्रत्येक अंतराळवीराला जाडणारा स्पेस अ‍ॅनीमिया काय आहे जाणून घ्या.
Space Anemia Explained Why It Affects Astronauts in Microgravity
Space Anemia Explained Why It Affects Astronauts in Microgravityesakal
Updated on

Sunita Williams Latest Update : अंतराळात दीर्घकाळ राहण्याने अंतराळवीरांच्या आरोग्यावर विविध प्रकारचे दुष्परिणाम होऊ शकतात, यामध्ये 'स्पेस अ‍ॅनीमिया' ही एक गंभीर समस्या आहे. नासाने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बॅरी विलमोर २०२५ च्या सुरुवातीपर्यंत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) राहणार आहेत. यानंतर ते पृथ्वीवर परत येण्यासाठी स्पेसएक्स ड्रॅगन वापरणार आहेत.

अंतराळ स्थानकावर दीर्घकाळ राहण्यामुळे अंतराळवीरांच्या शरीरावर सूक्ष्मगुरुत्वाकर्षणाचा परिणाम होतो. यामुळे शरीरातील लाल रक्तपेशींच्या संख्येत घट होते आणि शरीरातील लाल रक्तपेशींचे प्रमाण वेगाने कमी होऊ लागते. यामुळे 'स्पेस अ‍ॅनीमिया' ही समस्या निर्माण होते. साधारणपणे पृथ्वीवर दर सेकंदाला २ लाख लाल रक्तपेशी नष्ट होतात, परंतु अंतराळात हा आकडा ३ लाखांपर्यंत पोहोचतो.

Space Anemia Explained Why It Affects Astronauts in Microgravity
Sunita Williams Return Update : सुनीता विल्यम्सना पृथ्वीवर परत आणणारा नासाचा Crew-9 प्रोग्राम एवढा खास का?

२०२२ मध्ये नॅचर मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, अंतराळवीरांच्या दीर्घकालीन अंतराळ प्रवासादरम्यान 'स्पेस अ‍ॅनीमिया'मुळे शरीरात हेमोग्लोबिनचा ऱ्हास होतो, कार्बन मोनॉक्साइडची पातळी वाढते आणि शरीरातील लोहाची पातळी कमी होते. हे संशोधन १४ अंतराळवीरांवर त्यांच्या सहा महिन्यांच्या मिशन दरम्यान केले गेले होते.

स्पेस अ‍ॅनीमियाचा प्रभाव अंतराळवीरांच्या शरीरावर अंतराळात असतानाच नव्हे तर पृथ्वीवर परत आल्यानंतरही दिसून येतो. पृथ्वीवर परतल्यानंतर, अंतराळवीरांच्या शरीरात लाल रक्तपेशींचा ऱ्हास अधिक प्रमाणात होतो आणि त्यांच्या शरीरावर विविध प्रकारचे दुष्परिणाम होऊ शकतात.

Space Anemia Explained Why It Affects Astronauts in Microgravity
Sunita Williams Live : अंतराळात अडकून पडलेल्या सुनीता विल्यम्सचा महिन्याभरानंतर जगाशी संवाद, NASAच्या लाईव्ह सेशनमध्ये सांगितली खरी स्थिती

यामध्ये हाडांची घनता कमी होणे आणि दृष्टीसंबंधी समस्या निर्माण होणे या प्रमुख समस्यांचा समावेश आहे. अंतराळवीरांच्या शरीराच्या स्थितीनुसार, या समस्या दूर होण्यासाठी काही महिने लागू शकतात.

या सर्व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अंतराळवीरांना विशेष प्रशिक्षण दिले जाते, परंतु 'स्पेस अ‍ॅनीमिया'सारख्या समस्यांमुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.