TVS iQube: इलेक्ट्रिक स्कूटरच्या जगात TVS iQubeचे वारे, संपूर्ण कुटुंबासाठी एक उत्तम पर्याय

TVS iQube 2.2 kWh बाजारात चर्चेचा विषय ठरत आहे आणि त्याचे कारण देखील तेवढेच खास आहे. फक्त 94,999 रुपयांपासून सुरुवात असलेले हे मॉडेल एकदम अफलातून किमतीत आहे आणि त्यामुळे विश्वासार्ह, स्टायलिश आणि वैशिष्ट्यपूर्ण इलेक्ट्रिक स्कूटर शोधणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे.
tvs iqube
tvs iqubeesakal
Updated on

इलेक्ट्रिक स्कूटर ही वाहन प्रेमींची पहिली पसंत बनत आहे. अशात इलेक्ट्रिक स्कूटरच्या जगात TVS iQubeचे वारे वाहत आहे. या स्कूटरने भारतीय ऑटो मार्केटमध्ये आपल्या फीचर्समुळे एक मोठा धमाका केला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. 5 वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आणि 11 सुंदर रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असलेल्या TVS iQube एकदम दमदार इलेक्ट्रिक स्कूटर आहे. यामध्ये कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी काहीतरी न काहीतरी नवीन आहेच. शहरातील छोट्या-मोठ्या कामांसाठी वापरण्यापासून ते लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी, TVS iQube तुमच्या सर्व गरजा पूर्ण करते. या सीरिजमध्ये शहरातील रोजच्या धावपळीच्या प्रवासासाठी उत्तम पर्याय असलेला TVS iQube 2.2 kWh पासून ते 150 किमीची वास्तविक रेंज, 7 इंच रंगीत टचस्क्रीन आणि Alexa सहाय्यक यासारख्या हायटेक वैशिष्ट्यांसह शक्तिशाली TVS iQube ST 5.1 kWh पर्यंत सर्व काही आहे.

TVS iQube 2.2 kWhTVS iQube 2.2 kWh बाजारात चर्चेचा विषय ठरत आहे आणि त्याचे कारण देखील तेवढेच खास आहे. फक्त 94,999 रुपयांपासून सुरुवात असलेले हे मॉडेल एकदम अफलातून किमतीत आहे आणि त्यामुळे विश्वासार्ह, स्टायलिश आणि वैशिष्ट्यपूर्ण इलेक्ट्रिक स्कूटर शोधणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे. मार्केटमध्ये नवीन असूनही या इलेक्ट्रिक स्कूटरच्या सुरक्षा फीचर्समध्ये कोणतीही कमतरता ठेवण्यात आलेली नाहीये. हे कुटुंबांसाठी डिझाइन केलेले आहे आणि तुमच्या सर्व आवश्यक गोष्टी बजेटमध्ये बसाव्यात याची काळजी घेतली आहे. TVS ही भारतातील ऑटोमोबाइल उद्योग क्षेत्रातील विश्वासार्ह कंपनी आहे. TVS iQube सीरिज याला अपवाद नाही आणि TVS ची गुणवत्ता आणि ही नवीन कल्पना कंपनी प्रमाणेच विश्वासार्ह आणि चांगल्या दर्जाचीच आहे. TVS iQube 2.2 kWh सुरक्षा, सोय, तंत्रज्ञान, आराम किंवा स्टाइल या बाबतीत कोणत्याही प्रकारची तडजोड करत नाही.

tvs iqube
Car Launch in September : यंदाचा सप्टेंबर कार प्रेमींसाठी खास! लाँच होणार या ब्रँड कार,एकदा बघाच

फ्रंट डिस्क ब्रेक्स, क्रॅश/फॉल/टो अलर्ट्स, IP67 आणि AIS 156 पाणी आणि धूळ प्रतिरोधकता यांसारख्या सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही बाब दुर्लक्षित केलेली नाही. सुरक्षेच्या सर्व बाबींवर काटेकोरपणे लक्ष देण्यात आले आहे.रायडरच्या आरामदायकतेसाठी रुंद फूटबोर्ड,गाडीवर मागे बसणाऱ्या सोबतीच्यासाठी रुंद सीट्स आणि ३० लिटरची जागा असलेली सीटखालील स्टोरेज यासह प्रत्येक गोष्ट जास्तीत जास्त सोयीसाठी डिझाइन केलेला आहे.तंत्रज्ञानाच्या बाबतीत सर्व गोष्टी अगदी चोख आहेत.टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि कॉल आणि मेसेज अलर्ट्ससह हे वाहन अत्याधुनिक तंत्रज्ञान देण्यात कोणतीही कसर सोडत नाही..रायडिंग मोड्स (इको आणि पॉवर), कॉल अलर्ट्स, रंगीत TFT स्क्रीन आणि रिव्हर्स पार्किंग यासारखी वैशिष्ट्ये, ज्यासाठी काही ब्रँड्स अतिरिक्त शुल्क आकारतात, पण TVS iQube मध्ये कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क न आकारता या सुविधा दिल्या आहेत.तुमच्या कुटुंबासाठी TVS iQube 2.2 kWh व्हेरिएंट व्यतिरिक्त, TVS iQube मध्ये चार इतर व्हेरिएंट देण्यात आले आहेत. जर तुम्हाला 100 किमीची वास्तविक रेंज, 118 कनेक्टेड फीचर्स आणि 32 लिटरची स्टोरेज स्पेस हवा असेल तर TVS iQube 3.4 kWh तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.

tvs iqube
Electronic Vehicle : खरोखरच किती फायदेशीर? ईव्ही घेण्याची योग्य वेळ आलीये का?

जर तुम्हाला हे सर्व काही फीचर्स मोठ्या स्क्रीनसह हवे असेल तर TVS iQube S निवडा. जर तुम्हाला या तंत्रज्ञानात थोडा अपडेट हवा असेल आणि तुम्हाला 7 इंचचा टचस्क्रीन आवडत असेल तर TVS iQube ST 3.4 kWh देखील उत्तम पर्याय ठरू आहे. तुम्हाला सर्वोत्तम वैशिष्ट्ये आणि 150 किमीची रेंज हवी असेल तर TVS iQube ST 5.1 kWh हा उत्तम पर्याय आहे..आता काही बँकांकडून मिळणाऱ्या आकर्षक ऑफर्समुळे तुम्ही लेगेचच TVS iQube घरी आणू शकता.20000 रुपयांपर्यंतचे लाभ, 100% फंडिंग आणि 7999 रुपये इतक्या कमी डाउन पेमेंट, EMI देखील 2499 रुपये अश्या बऱ्याच सुविधा आहेत.TVS iQube ची प्रभावी रेंज आणि स्मार्ट वैशिष्ट्यांसह, हे फक्त एक वाहन नाही तर आधुनिक भारतीय कुटुंबासाठी एक विश्वासार्ह साथीदार आहे, जे प्रत्येक प्रवासाला सुलभ, स्टायलिश आणि सुरक्षित बनवते. TVS iQube भारतीय कुटुंबाचे इलेक्ट्रिक वाहन बनलेले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.