Digital Fraud: डिजिटल पेमेंट करताना भीती वाटते? फसवणूक टाळण्यासाठी या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

डिजिटल फ्रॉडपासून सुरक्षित राहण्यासाठी या महत्त्वाच्या टिप्स फॉलो करा.
Digital Fraud: डिजिटल पेमेंट करताना भीती वाटते? फसवणूक टाळण्यासाठी या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
Updated on

डिजिटल फ्रॉड ही आजकाल एक सामान्य गोष्ट झाली आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पेमेंट करताना लोक फसवणुकीचे बळी होऊ शकतात. तुम्ही डिजिटल व्यवहार नियमित करत असाल तर आर्थिक फसवणुकीपासून सावध राहा. यासाठी तुम्ही सुरक्षितता जपली पाहिजे.

डिजिटल फ्रॉड म्हणजे काय?

डिजिटल फ्रॉड हा इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा वापर करून केला जातो. हे ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही असू शकते. डिजिटल फ्रॉडचे अनेक प्रकार आहेत.

फिशिंग हा ईमेल फसवणुकीचा एक प्रकार आहे. अनेकदा ओळखीच्या व्यक्तीकडून ईमेल किंवा सोशल मीडियावर मेसेज येतो. आपणही व्यक्ती ओळखीची असल्याने सर्व काही शेअर करतो. त्यानंतर आपली सर्व इन्फो त्याच्याकडे पोहचली जाते.

जेव्हा तुम्ही फिशिंग वेबसाइटवर तुमची वैयक्तिक माहिती, जसे की क्रेडिट कार्ड नंबर किंवा पासवर्ड टाकता, तेव्हा गुन्हेगार ती माहिती तुमच्या खात्यात प्रवेश करण्यासाठी किंवा तुमचा आयडी चोरण्यासाठी वापरू शकतो.

Digital Fraud: डिजिटल पेमेंट करताना भीती वाटते? फसवणूक टाळण्यासाठी या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
WhatsApp New Feature : आता व्हॉट्सअ‍ॅपवर महत्त्वाचे मेसेज हरवणार नाहीत; कंपनी आणतेय खास फीचर

स्पॅम ईमेल किंवा मेसेज सहसा जाहिरात फसवणूक करण्यासाठी वापरले जातात. स्पॅम अनेकदा तुमच्या माहितीची विनंती करतो जसे की क्रेडिट कार्ड नंबर किंवा पासवर्ड. सायबर क्राईम हा एक प्रकारचा गुन्हा आहे जो कंप्यूटर किंवा इंटरनेट वापरून केला जातो. मालवेअर आणि डेटाचा वापर अनेकदा डिजिटल फ्रॉडसाठी केला जातो.

तुमच्या बँक किंवा क्रेडिट कार्ड कंपनीला ताबडतोब सूचित करा

तुमची डिजिटल फसवणूक होत असल्यास, प्रथम तुमच्या बँक किंवा क्रेडिट कार्ड कंपनीला कळवा. हे तुमचे कार्ड ब्लॉक करेल आणि पुढील नुकसान टाळेल.

UPI फसवणुकीच्या बाबतीत:

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गाइडलाइन्स सांगतात की UPI वर फसवणूक झाल्यास, UPI सर्विस प्रोव्हायडरला (Google Pay, Phone Pay किंवा Paytm) कळवा. तुम्ही UPI अॅपमधील सर्विस प्रोव्हायडरला फसवणुकीच्या व्यवहाराबद्दल माहिती देऊन तुम्ही रिफंड मागू शकता.

UPI पोर्टलवर तक्रार करा:

जर तुम्हाला UPI सर्विस प्रोव्हायडरकडून मदत मिळाली नसेल, तर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या वेबसाइट npci.org.in वर तक्रार नोंदवा.

तुम्ही पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर (PSP) बँक आणि तुमच्या बँकेला याबाबत कळवू शकता.

रिफंड न मिळाल्यास

मागील सर्व पावले उचलूनही तुम्हाला 30 दिवसांच्या आत रिफंड किंवा कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्यास, बँकिंग ओम्बुड्समैन किंवा ओम्बुड्समैन फॉर डिजिटल कम्प्लेंट्स यांच्याकडे तक्रार करा.

आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, हे cms.rbi.org.in वेबसाइटला भेट देऊन किंवा crpc@rbi.org.in वर ईमेल पाठवून करावे लागेल. बँक फसवणूक झाल्यास, बँक खाते किंवा नेट बँकिंगद्वारे फसवणूक झाली असल्यास, विलंब न करता तुमच्या बँकेला कळवा. असे केल्यास, तुमचे 25,000 रुपयांपर्यंतचे नुकसान 3 दिवसात भरून काढले जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()