Electric Scooter : अचानक संपली स्कूटरची चार्जिंग, अन् घर आहे दूर? जाणून घ्या अशा वेळी काय कराल

देशात अगदी कमी ठिकाणी चार्जिंग स्टेशन उपलब्ध आहेत.
Electric Scooter
Electric ScootereSakal
Updated on

इलेक्ट्रिक स्कूटरची सर्वात मोठी समस्या म्हणजे तिचं चार्जिंग. तुमच्याकडे जर पेट्रोलची स्कूटर असेल, आणि त्यातील पेट्रोल संपलं; तर तुम्ही एखाद्या बॉटल किंवा कॅनमधून ते आणू शकता. मात्र, इलेक्ट्रिक स्कूटरमधील चार्जिंग संपलं तर काय?

देशात सध्या इलेक्ट्रिक स्कूटर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र, तुलनेने अगदी कमी ठिकाणी चार्जिंग स्टेशन उपलब्ध आहेत. त्यामुळे, अचानक मध्येच जर तुमच्या स्कूटरचं चार्जिंग संपलं, तर तुमच्याकडे एकच पर्याय उरतो - तो म्हणजे स्कूटर जवळच्या चार्जिंग स्टेशनवर किंवा घरी नेणं.

Electric Scooter
E-Scooter : इलेक्ट्रिक स्कूटर कंपन्यांना मोदी सरकारचा दणका; मोठा दंड होण्याची शक्यता

गुगल मॅपची मदत

तुम्हाला जवळचं चार्जिंग स्टेशन माहिती नसेल, तर ते शोधण्यासाठी तुम्ही गुगल मॅप्सची मदत घेऊ शकता. जर दोन किलोमीटरच्या आसपास एखादं चार्जिंग स्टेशन दिसत असेल, तर तुम्ही गाडी ढकलत तिथपर्यंत नक्कीच नेऊ शकता.

मित्रांची मदत

तुमची गाडी जिथे बंद पडली आहे, तिथून जवळपास एखाद्या मित्राचं घर आहे का याचा विचार करा. अशा वेळी तुम्ही त्याच्या घरापर्यंत स्कूटर नेऊन तिथे चार्ज करू शकता.

Electric Scooter
Electric vehicle : बिनधास्त घ्या, इलेक्ट्रीक गाडी! महावितरणच्या पुढाकाराने राज्यात उभारणार ३२१४ चार्जिंग स्टेशन

बॅटरी स्वॅपिंग

जर तुमच्या इलेक्ट्रिक स्कूटरमधील बॅटरी ही स्वॅपेबल असेल, तर जवळच्या एखाद्या बॅटरी स्वॅपिंग स्टेशनला जाऊन तुम्ही चार्ज असलेली बॅटरी घेऊ शकता. यामुळे तुम्हाला चार्जिंगसाठी थांबण्याचीही गरज भासणार नाही.

गाडी करू शकता टो

चार्जिंग स्टेशन किंवा घर भरपूर लांब असेल, तर तुम्ही गाडी टो करूनही नेऊ शकता. गुगलवर सर्च करून तुम्ही तुमच्या शहरातील टोईंग सर्विस देणाऱ्या कंपनीचा नंबर मिळवू शकता. हे लोक तुमची गाडी टो करून घरापर्यंत पोहोचवून देतील. मात्र, यासाठी तुम्हाला काही पैसे खर्च करावे लागतील.

Electric Scooter
Electricity Bill : घरमालक जास्त लाईट बिल घेतोय? सब-मीटरमध्ये असू शकतो झोल; लगेच करा चेक!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.