Laptop For Students: ऑनलाइन शिक्षण वाढले आहे, मुलांना लॅपटॉपची गरज आहे... कोणता घ्यावा?

दहावी बारावीच्या परिक्षाही संपल्या आहेत अशात मुलांना आपल्या पुढच्या शिक्षणासाठी लॅपटॉप लागेलच
Best Laptop For Students
Best Laptop For Studentsesakal
Updated on

Laptop For Students: सध्या ऑनलाइन शिक्षण पद्धती वाढली आहे त्यामुळे अगदी शाळेतल्या मुलांनाही लॅपटॉपची गरज भासते. त्यात दहावी बारावीच्या परिक्षाही संपल्या आहेत अशात मुलांना आपल्या पुढच्या शिक्षणासाठी लॅपटॉप लागेलच. पण लॅपटॉप खरेदी करायचा म्हटला की प्रश्न पडतो नक्की कोणता लॅपटॉप घ्यावा. 

बाजारात अगदी 20 हजारापासून तर लाखों रुपयांपर्यंत लॅपटॉप उपलब्ध आहेत. पण अशात जो स्वस्त तो घेतला असं करुन चालत नाही. कारण प्रत्येका लॅपटॉपची आपली अशी वेगळी खाशीयत आहे आणि त्याचे वेगवेगळे फिचर्स आहेत. 

तुमच्या मुलाच्या वयानुसार आणि मुळात शिक्षणानुसार कोणता लॅपटॉप घ्यावा हे ठरतं. सध्या बाजारात लॅपटॉप सोबत आणखीन एक गोष्ट इंट्रड्यूस झाली आहे जी आहे लॅपटॉप सारखीच पण त्यांना Chromebook असं म्हणतात. अनेकदा शाळा सुद्धा सध्या या क्रोमबूकलाच प्राधान्य देता आहेत. 

अशात चला बघूया तुमच्या मुलासाठी कोणता लॅपटॉप बेस्ट ठरेल: (best laptop for your child)

प्राथमिक शाळेतल्या मुलांसाठी सर्वोत्तम लॅपटॉप

जर तुमचा मुलगा किंवा मुलगी प्राथमिक शाळेत जात असेल तर त्याला लागणारे अॅप्लिकेशन फारच कमी आहेत, जसे की 

  • पॉवर पॉइंट 

  • मायक्रोसॉफ्ट वर्ल्ड

  • पेंट 

  • गूगल मिट 

 त्यापल्याड त्यांना गेम खेळायला आणि कार्टून बघायला यूट्यूब लागेल इतकंच. हो पण एवढंच असलं तरीही त्या लॅपटॉप मध्ये किती GB data आहे हे मात्र बघून घ्या. 

जसे की: 

  • Amazon Fire HD 10 Kids Edition 

  • Lenovo Chromebook Duet 3 

  • Apple 10.2-inch iPad 

  • Microsoft Surface Go 3 

  • Google Pixelbook Go 

  • Lenovo Chromebook Duet 3 

Best Laptop For Students
Acer Swift Go : केवळ 30 मिनिटांत चार्ज होणारा Laptop लाँच, देणार 4 तासांचा बॅटरी बॅकअप

माध्यमिक शाळेतील मुलांसाठी सर्वोत्तम लॅपटॉप

माध्यमिक शाळेतल्या मुलांचे बरेचसे काम हे वेब पोर्टल वरती असते. त्यांना ब्राऊझिंगची सर्वात जास्त गरज असते. अशात त्यांना जास्त बॅटरी बॅकअप असलेले लॅपटॉप जास्त गरजेचे आहेत. ते वापरणारे अॅप्लिकेशन म्हणजे 

  • Gmail

  • Google Slides

  • Google Sheets

  • Google Classroom

यासाठी chormebook हा सुंदर पर्याय आहे जसे की, 

  • HP Chromebook x360 

  • Lenovo Flex 3 Chromebook 

  • Lenovo 300e 

  • Acer Aspire 5

  • Microsoft Surface Laptop GO 2

Best Laptop For Students
HP New Laptop : HP ने लॉन्च केला नवा लॅपटॉप, प्रीमियम डिझाइनसह मिळणार दमदार फीचर्स

ज्युनियर कॉलेजच्या मुलांसाठी सर्वोत्तम लॅपटॉप

दहावी झालेल्या मुलांना बेसिक लॅपटॉप घेऊन काही फायदा नाही. त्यांना उत्तम ग्राफिक्स असलेला लॅपटॉप, high resolution चा लॅपटॉप गरजेचा आहे. त्यामुळे त्या पद्धतीचे लॅपटॉप गरजेचे आहेत 

जसे की 

  • Acer Chromebook Spin 514

  • Apple iPad Air

  • Acer Chromebook Spin 714 

  • Dell XPS 13

Best Laptop For Students
Samsung Laptop: 5G सपोर्टसह आला Samsung चा भन्नाट लॅपटॉप, फीचर्स खूपच जबरदस्त

कॉलेजच्या मुलांसाठी सर्वोत्तम लॅपटॉप

जर तुमचा मुलगा किंवा मुलगी कॉलेजमध्ये गेले आहेत म्हणून तुम्ही लॅपटॉप घेत असाल तर हा लॅपटॉप घेण्याआधी 10 वेळेस विचार करा. मुळात पैशाचं बजेट व्यवस्थित ठेवा. तुमच्या मुलाची फील्ड कोणती आहे? त्याला कोणते फिचर्स लागतात हे आधी समजून घ्या. 

अनेकदा इंजिनियर, ग्राफिक्स डिझाइनर किंवा व्हिडिओ एडिटर यांना प्रॉपर ग्राफिक्स असलेले लॅपटॉप लागतात. त्यामुळे आपल्या मुलांना विचारूनच लॅपटॉप घ्या. 

जसे की,  

  • Acer Swift 3 

  • HP Envy x360 13 

  • Dell XPS 13

  • Surface Laptop 5 

  • HP Specter x360 14

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.