Whastapp New Feature : व्हॉट्सॲप वापरकर्त्यांसाठी खुशखबर! कीपॅड न वापरता करा चॅटिंग; कसं वापराल नवीन फीचर? बघाच

How to Use WhatsApp’s New Voice Note Transcription on Android : व्हॉट्सॲपने अखेर भारतात Android वापरकर्त्यांसाठी वॉइस मेसेजचे मजकूर करण्याची (Voice Note Transcription) बहुचर्चित सुविधा आणली आहे.
How to Use WhatsApp’s New Voice Note Transcription on Android
How to Use WhatsApp’s New Voice Note Transcription on Androidesakal
Updated on

WhatsApp Voice Note Transcription : व्हॉट्सॲप वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी आहे. व्हॉट्सॲपने अखेर भारतात Android वापरकर्त्यांसाठी वॉइस मेसेजचे मजकूर करण्याची (Voice Note Transcription) बहुचर्चित सुविधा आणली आहे. या नवीन फीचरमुळे आता तुम्ही थर्ड-पार्टी ॲप्सचा वापर न करता थेट व्हॉट्सॲपवर तुमच्या आवाजात संदेशांचे मजकूर तयार करू शकता. हा आवाजाचा मजकूर तयार करणारा पर्याय हिंदीसह अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे, त्यामुळे आता संदेशांचा अर्थ समजण्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा आवाज ऐकावा लागणार नाही.

या फीचरचा वापर कसा करायचा?

  • व्हॉट्सॲपच्या सेटिंग्जमध्ये जा आणि "चॅट्स" (Chats) निवडा.

  • "व्हॉइस मेसेज ट्रान्सक्रिप्ट्स" (Voice Message Transcripts) पर्याय चालू करा.

  • आता एखादा आवाज संदेश आला की त्याच्या खाली "ट्रान्सक्राइब" (Transcribe) चा पर्याय दिसून येईल.

  • या पर्यायावर क्लिक केल्यावर व्हॉट्सॲप मजकूर फाईल डाउनलोड करेल आणि संदेशाखाली मजकूर दाखवेल.

How to Use WhatsApp’s New Voice Note Transcription on Android
Whatsapp Video Call Feature : व्हॉट्सॲपची Google Meet अन् Zoomला टक्कर! व्हिडीओ कॉलिंगमध्ये एकदम जबरदस्त अपडेट

गोपनियता आणि सुरक्षा

व्हॉट्सॲप तुमच्या सर्व संदेशांना एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनद्वारे सुरक्षित ठेवते. म्हणजे फक्त पाठवणारा आणि प्राप्तकर्ताच संदेश ऐकू शकतात. तसेच, तयार केलेला मजकूर फाईलही पूर्णपणे खासगी असतो, त्यामुळे तुमच्या संदेशांची गोपनियता कायम राखली जाते.

How to Use WhatsApp’s New Voice Note Transcription on Android
Whatsapp Spam Message Blocker : व्हॉट्सअ‍ॅपवर येणारे स्पॅम मेसेज आपोआप होणार ब्लॉक; हे नवीन फीचर कसं वापराल?

व्हॉट्सॲप फक्त वॉइस मेसेजचे मजकूर तयार करण्यापेक्षा पुढे जात आहे. येत्या काळात येणारा नवीन पर्याय तुमच्या फोनच्या थीमपासून स्वतंत्रपणे व्हॉट्सॲपसाठी वेगळी थीम निवडण्याची सुविधा देणार आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीची थीम निवडून व्हॉट्सअँपचा वापर अधिक वैयक्तिकृत करू शकता.

या अपडेट्सद्वारे व्हॉट्सअँप तुमची संवाद साधण्याची क्षमता वाढवत आहे. आता तुम्ही अधिक प्रभावीपणे आणि सुरक्षितपणे व्हॉट्सॲपवर संवाद साधू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.