WhatsApp AI Chatbot : प्रिस्क्रिप्शन वाचायला अडचण येतेय? व्हॉट्सअ‍ॅपवरचा 'एआय डॉक्टर' करेल मदत.. आणखीही बरेच फायदे

तुम्ही जर डाएट फॉलो करत असाल, तर खाण्यातील पदार्थांबाबत देखील हा चॅटबॉट तुम्हाला सल्ले देऊ शकतो.
WhatsApp AI Chatbot
WhatsApp AI ChatboteSakal
Updated on

WhatsApp AI Bot : कित्येक वेळा डॉक्टरांनी लिहून दिलेली चिठ्ठी (प्रिस्क्रिप्शन) वाचताना नाकी नऊ येतं. मात्र डॉक्टरांनी सांगितलेल्या गोळ्या घेणं तर गरजेचं असतं. अशा वेळी तुमच्या मदतीला व्हॉट्सवरचा एआय डॉक्टर येऊ शकतो. तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवरच तुम्हाला हे प्रिस्क्रिप्शन वाचून मिळू शकतं. आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे हे शक्य झालं आहे.

यासाठी तुम्हाला पुढील प्रोसेस फॉलो करावी लागेल -

  • सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवर 8738030604 हा नंबर सेव्ह करा.

  • यानंतर तुमच्याकडे असलेल्या प्रिस्क्रिप्शनचा फोटो घ्या.

  • हा फोटो तुम्ही वर दिलेल्या नंबरवर सेंड करा.

  • यानंतर एआय चॅटबॉट हे प्रिस्क्रिप्शन वाचून, ते तुम्हाला कळेल अशा भाषेत मेसेज पाठवेल.

WhatsApp AI Chatbot
WhatsApp Chat : व्हॉट्सॲपचे जुने चॅट शोधण्यासाठी स्ट्रगल करावा लागणार नाही, फक्त ‘या’ टिप्स करा फॉलो

इतर गोष्टींमध्येही फायदा

या एआय चॅटबॉटचा केवळ एवढाच फायदा नाही. तुम्ही जर डाएट फॉलो करत असाल, तर खाण्यातील पदार्थांबाबत देखील हा चॅटबॉट तुम्हाला सल्ले देऊ शकतो. यासोबतच, तुम्ही आपल्या डाएटबद्दल माहिती दिली आणि सध्या खात असणाऱ्या पदार्थाचा फोटो या चॅटबॉटला पाठवला, तर तो पदार्थ तुमच्या डाएटसाठी योग्य आहे की नाही याबाबत देखील तुम्हाला माहिती मिळेल.

व्हॉईस नोट फीचरही उपलब्ध

या एआय चॅटबॉटमध्ये एक व्हॉईस नोट फीचरही आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे, तुम्ही याला व्हॉईस रेकॉर्ड करूनही प्रश्न विचारू शकता. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देखील व्हॉईस नोटच्या माध्यमातून रेकॉर्ड होऊन येईल. यामुळे ज्यांना वाचता येत नाही अशा व्यक्तीही या चॅटबॉटची मदत घेऊ शकतात.

WhatsApp AI Chatbot
WhatsApp AI Features : फोटो एडिटिंग होणार सोप्पं.. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये मिळणार दोन खास एआय फीचर्स

डिस्क्लेमर : हे चॅटबॉट फीचर आपल्या मदतीसाठी आहे. यावर पूर्णपणे विसंबून राहू नये. कोणतंही औषध घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.