Whatsapp Avatar Feature : व्हॉट्सॲपच्या अवतार फीचरला आलंय नवीन अपडेट; कसं वापराल? जाणून घ्या

Whatsapp New Update : लवकरच व्हॉट्सॲप वापरकर्ते त्यांच्या प्रोफाइलमध्ये स्वतःचा अवतार वापरू शकणार आहेत.
WhatsApp to Introduce Avatar Feature in Profile Section
WhatsApp to Introduce Avatar Feature in Profile Section esakal
Updated on

Tech Update : जगभरात ३०० कोटींहून अधिक वापरकर्ते असलेले लोकप्रिय मेसेजिंग ॲप हे व्हॉट्सॲप आहे. व्हॉट्सॲप आपल्या वापरकर्त्यांसाठी नेहमीच नवनवीन फीचर घेऊन येत असते. मग त्यामध्ये व्हॉट्सॲप व्हॉइस स्टेटस,त्याचबरोबर एचडी क्वालिटी फोटो पाठवण्याची सुविधा असे अनेक फीचर व्हॉट्सॲपने आतापर्यंत आणले आहेत आणि भविष्यातही नवनवीन फीचर आणण्याच्या प्रयत्नात आहे. अशात व्हॉट्सॲपने लवकरच एक नवीन अपडेटेड फीचर लॉन्च करत आहे.

व्हॉट्सॲपने आणखी एक नवी सुविधा देण्याची तयारी केली आहे. लवकरच वापरकर्ते आपल्या प्रोफाइलमध्ये आपलाच अवतार वापरू शकणार आहेत.

व्हॉट्सॲपने अवतार फीचर लाँच केले होते. पण आता कंपनी या आधीच्या फीचरमध्ये आणखी बदल करत आहे. वापरकर्ते आपला अवतार कस्टमाइज करू शकतील, अशी माहिती व्हॉट्सॲपच्या अपकमिंग फीचर्स ट्रॅक करणाऱ्या वेबसाइट वाबेताईन्फोने दिली आहे.

वाबेताईन्फोने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटनुसार, वापरकर्ते आता दुसऱ्या व्यक्तीच्या प्रोफाइलमध्ये त्यांचा अवतार पाहू शकतील. याचा अर्थ असा की, वापरकर्ते आपल्या प्रोफाइलसाठी अवतार सेट करू शकतील आणि इतर वापरकर्ते त्यांच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करून तो पाहू शकतील.

WhatsApp to Introduce Avatar Feature in Profile Section
Whatsapp Chat Lock : व्हॉट्सॲपचे पर्सनल चॅट लपवायचे आहेत? असं वापरा ॲपमधलं चॅट लॉक आणि हाईड फिचर

दरम्यान, व्हॉट्सॲप वापरकर्त्यांच्या अनुभवात सुधारणा करण्यासाठी सतत नवीन फीचर्सवर काम करत आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, कंपनी व्हिडिओ कॉलिंगचा अनुभव सुधारण्यासाठी फिल्टर जोडण्यावर काम करत आहे. याशिवाय वापरकर्ते व्हॉट्सॲप स्टेटस पुन्हा शेअर करण्याची सुविधाही लवकरच मिळणार आहे. तसेच इंटरनेट कनेक्शनशिवाय फोटो आणि फाइल्स ट्रान्सफर करण्याची सुविधाही येत आहे.

WhatsApp to Introduce Avatar Feature in Profile Section
BSNL Rechage Plan : BSNL धमाका ऑफर! फक्त 91 रुपयांच्या रिचार्जमध्ये 90 दिवसांची वैधता, कॉलिंग अन् डेटासह इतर भन्नाट सुविधा

त्याच बरोबर दिल्लीत ट्रॅफिक नियमभंग करणाऱ्यांना लवकरच व्हॉट्सॲपद्वारे दंड ऑनलाइन स्वरूपातच मिळणार आहे. लेफ्टिनंट गव्हर्नर व्ही.के. सक्सेना यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत याबाबत निर्देश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.