WhatsApp Accounts Ban : व्हॉट्सअ‍ॅपची मोठी कारवाई! जून महिन्यात 66 लाखांहून अधिक अकाउंट्स बंद; स्कॅम रोखण्यासाठी निर्णय

कंपनीच्या यूजर पॉलिसीचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
WhatsApp Accounts Ban
WhatsApp Accounts BaneSakal
Updated on

व्हॉट्सअ‍ॅपवर होणाऱ्या स्कॅमना आळा घालण्यासाठी कंपनीने मोठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. यासाठी कंपनीने एकट्या जून महिन्यात तब्बल 66 लाख अकाउंट्सना बॅन केलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या यूजर पॉलिसीचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

कंपनीने आपल्या जून महिन्याच्या सेफ्टी रिपोर्टमध्ये याबाबत माहिती दिली. 1 जून ते 30 जून या कालावधीमध्ये आपण 66,11,700 अकाउंट्स बॅन केले असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. यातील बहुतांश अकाउंट्सना यूजर्सच्या तक्रारींनंतर बंद करण्यात आलं आहे. तर 24,34,200 अकाउंट्स हे कंपनीने स्वतःच केलेल्या चाचणीनंतर बॅन करण्यात आले आहेत.

WhatsApp Accounts Ban
WhatsApp Spam Calls : व्हॉट्सअ‍ॅपवर +92, +84, +62 या नंबरवरुन कॉल येत असतील तर व्हा सावध! दुर्लक्ष करणं ठरेल मोठी चूक

जून महिन्यात कंपनीला फ्रॉड अकाउंट्सबद्दल 7,893 तक्रारी मिळाल्या होत्या. यामधील 337 अकाउंट्सवर व्हॉट्सअ‍ॅपने कारवाई केली. कंपनीने काही अकाउंट्सवर निर्बंध लागू केले आहेत, तर काही अकाउंट्स पूर्णपणे बंद केले आहेत.

यूजर्सच्या सुरक्षेसाठी मोठे निर्णय

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या यूजर्सच्या डेटा सुरक्षेसाठी कित्येक मोठे निर्णय घेतले आहेत. एंड-टू-एंड इन्क्रिप्टेड सुविधेमुळे दोन यूजर्समधील मेसेज हे तिसरी व्यक्ती वाचू शकत नाही. सोबतच, व्हॉट्सअ‍ॅपने अनोळखी नंबरवरुन येणारे कॉल्स सायलेंट करण्यासाठी वेगळा ऑप्शनही दिला आहे.

WhatsApp Accounts Ban
WhatsApp Safety Features : व्हॉट्सअ‍ॅपने अँड्रॉईड यूजर्ससाठी आणले नवे सेफ्टी फीचर्स! जाणून घ्या सविस्तर

ई-मेल फीचर येणार

व्हॉट्सअ‍ॅप सध्या एका ई-मेल फीचरवर काम करत आहे. यामुळे यूजर्सची सुरक्षा आणखी मजबूत होणार आहे. यामुळे आपलं व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट यूजर्स ई-मेलशी जोडू शकतील. या ई-मेलवर येणाऱ्या एका ओटीपीच्या माध्यमातून यूजर्स लॉग-इन करू शकतील. सध्या या फीचरवर काम सुरू असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com