WhatsApp Ban: WhatsApp ने 28 दिवसांत 45 लाखांहून अधिक खाती केली बंद; काय आहे कारण?

कंपनी दर महिन्याला आपला यूजर सेफ्टी रिपोर्ट जारी करते.
WhatsApp Ban
WhatsApp BanSakal
Updated on

WhatsApp Ban: लोकप्रिय इन्स्टंट चॅटिंग अॅप WhatsApp ने फेब्रुवारीमध्ये 45 लाखांहून अधिक खात्यांवर बंदी घातली आहे. WhatsApp ने जारी केलेल्या अहवालानुसार, कंपनीने जानेवारीमध्ये 29 लाख खात्यांवर बंदी घातली होती.

यापूर्वी डिसेंबरमध्ये 36 लाख आणि नोव्हेंबरमध्ये 37 लाख खाती बंद करण्यात आली होती. कंपनी दर महिन्याला आपला यूजर सेफ्टी रिपोर्ट जारी करते, ज्यामध्ये व्हॉट्सअॅपवर आलेल्या तक्रारींचा तपशील तसेच त्यांच्यावर केलेल्या कारवाईचा तपशील असतो.

किती खात्यांवर कारवाई?

व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्याने सांगितले की, ताज्या मासिक अहवालानुसार, व्हॉट्सअॅपने फेब्रुवारी महिन्यात 45 लाखांहून अधिक खात्यांवर बंदी घातली आहे.

या अहवालात 1 फेब्रुवारी 2023 ते 28 फेब्रुवारी 2023 दरम्यान 45,97,400 व्हॉट्सअॅप अकाऊंट्स बॅन करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. (WhatsApp bans over 4.5 million Indian accounts in February says Report ras98)

खात्यांवर का घातली बंदी :

द्वेषयुक्त भाषण, चुकीची माहिती आणि खोट्या बातम्या पसरवण्यासाठी मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो. अशा प्रकारची माहिती टाळण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खाते बंद केले जाते.

WhatsApp Ban
GST Revenue Collection: अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी; मार्च महिन्यात जीएसटी कलेक्शन 1.6 लाख कोटी पार

व्हॉट्सअॅपच्या अहवालानुसार, फेब्रुवारी महिन्यात कंपनीला 2,804 तक्रारी प्राप्त झाल्या आणि 504 खात्यांवर कारवाई करण्यात आली. या अहवालांमध्ये, 2,548 अहवाल 'बॅन अपील'शी संबंधित आहेत. अहवालात म्हटले आहे, “आम्ही प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींना प्रतिसाद देतो. फक्त त्या तक्रारींना उत्तर दिले जात नाही ज्या आधीच्या तक्रारीप्रमाणेच असतात.''

भारत सरकारच्या IT नियमांनुसार, मोठ्या डिजिटल प्लॅटफॉर्मने (50 लाखांहून अधिक वापरकर्ते) दर महिन्याला प्राप्त झालेल्या तक्रारी आणि त्यावर केलेल्या कारवाईचा तपशील देणारा अहवाल सादर करणे आवश्यक आहे. या मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर द्वेषयुक्त भाषण, चुकीची माहिती आणि खोट्या बातम्या पसरवल्या जातात.

WhatsApp Ban
शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.