Whatsapp Green Screen Error : नव्या अपडेटनंतर व्हॉट्सअ‍ॅप झाले क्रॅश; फोनवर 'ग्रीन स्क्रीन' एरर का येत आहे? नेमकं कारण वाचा

WhatsApp Beta Users Report Green Screen Crashes : व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या बीटा अपडेट (v2.24.24.5) वापरणाऱ्या युजर्सना अलीकडेच 'ग्रीन स्क्रीन' बगचा सामना करावा लागत आहे.
Millions of WhatsApp Beta Users Face Green Screen Glitch
Millions of WhatsApp Beta Users Face Green Screen Glitchesakal
Updated on

Green Screen Error on WhatsApp Beta : व्हॉट्सअ‍ॅप आता जगभरातील प्रत्येक वापरकर्त्याच्या मोबाईलमध्ये असलेले आवडते अ‍ॅप बनले आहे. पण याच व्हॉट्सअ‍ॅपच्या बाबतीत नुकतीच एक घटना घडली आहे. ज्यामुळे लाखों वापरकर्ते हैराण झाले आहेत. व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या बीटा अपडेट (v2.24.24.5) वापरणाऱ्या युजर्सना अलीकडेच 'ग्रीन स्क्रीन' बगचा सामना करावा लागत आहे. या बगमुळे अॅपमध्ये 'ग्रीन स्क्रीन' दिसत असून, अचानक अॅप बंद होत आहे. परिणामी, अनेक युजर्सना त्यांच्या चॅट्स पाहणे किंवा संदेश पाठवणे अशक्य झाले आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा वर्जनवर नवीन फीचर्सची चाचणी घेणाऱ्या लाखो युजर्सना या बगमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.

बीटा युजर्सवर परिणाम, नवीन फीचर्सची चाचणी ठप्प

व्हॉट्सअ‍ॅपवर येणाऱ्या नवीन फीचर्सची चाचणी घेणाऱ्या बीटा युजर्सना या बगमुळे विशेषत: अडथळा निर्माण झाला आहे. नवीन बीटा वर्जनमध्ये समोर आलेल्या या बगमुळे युजर्सना अॅपच्या यूजर इंटरफेसचा वापर करता येत नाही, तसेच चॅट्स उघडण्याचा प्रयत्न केल्यास स्क्रीन हिरव्या रंगाची होऊन दिसते, ज्यामुळे चॅट विंडोही ओपन होत नाही.

Millions of WhatsApp Beta Users Face Green Screen Glitch
Social Media Ban : हे काय नवीन! 16 वर्षांच्या आतील मुलांचे सोशल मीडिया अकाऊंट होणार बंद, या सरकारचा मोठा निर्णय

युजर्सची नाराजी, व्हॉट्सअ‍ॅपकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया नाही.अनेक बीटा युजर्सनी या समस्येमुळे त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. अद्याप व्हॉट्सअ‍ॅपकडून या बगविषयी अधिकृत निवेदन आलेले नाही. मात्र, व्हॉट्सअ‍ॅपच्या डेव्हलपमेंट टीमकडून या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

Millions of WhatsApp Beta Users Face Green Screen Glitch
Sim Card Block : मोबाईल वापरकर्त्यांसाठी अलर्ट! ब्लॉक केले तब्बल 1 कोटी 17 लाख सिमकार्ड,नेमकं प्रकरण काय?

बग फिक्ससाठी अपडेटची प्रतीक्षा

या बगसाठी लवकरच एक अपडेट येण्याची शक्यता आहे, परंतु याबद्दल अद्याप वेळापत्रक निश्चित झालेले नाही. तोपर्यंत, युजर्सना या समस्येचा तात्पुरता उपाय म्हणून अॅप पुन्हा इन्स्टॉल करण्याचा किंवा बीटा वर्जन सोडून नियमित वर्जनवर स्विच करण्याचा सल्ला दिला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.