WhatsApp Chat Hide : व्हॉट्सअॅपने काही दिवसांपूर्वी अॅपला एक सिक्युरिटी फीचर अॅड केलं होतं. यामुळे संपूर्ण अॅपला फिंगरप्रिंट लॉक लावता येत होतं. मात्र, आता कंपनीने यातच आणखी एक अपडेट दिला आहे. यामुळे तुम्हाला विशिष्ट चॅटला देखील लॉक करता येणार आहे. यामुळे तुम्हाला संपूर्ण अॅप लॉक करण्याची गरज भासणार नाही.
व्हॉट्सअॅप हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. भारतात देखील याचे कोट्यवधी यूजर्स आहेत. केवळ मित्र किंवा कुटुंबीयांना मेसेज करण्यासाठीच नव्हे, तर ऑफिसच्या कामासाठी देखील व्हॉट्सअॅपचा वापर करणं आता सामान्य झालं आहे. यामुळेच व्हॉट्सअॅप सुरक्षित ठेवणं देखील महत्त्वाचं आहे.
व्हॉट्सअॅपने आपल्या बीटा 2.23.24.20 या व्हर्जनमध्ये एक खास अपडेट दिलं आहे. यामध्ये सीक्रेट कोडचा वापर करुन चॅट लॉक करण्याचा पर्याय दिला आहे. यामुळे विशिष्ट चॅट्स लपवण्यासाठी एक्स्ट्रा सिक्युरिटी लेयर उपलब्ध झाली आहे. (Tech News)
व्हॉट्सअॅपवर सध्या सिक्युरिटीसाठी फिंगरप्रिंट किंवा पासकोड लॉक सुविधा उपलब्ध आहे. सीक्रेट कोड फीचरमुळे याला आणखी बळकटी मिळणार आहे. एखाद्या व्यक्तीने पासकोड टाकून किंवा अन्य पद्धतीने तुमचं व्हॉट्सअॅप ओपन जरी केलं, तरीही सीक्रेट कोड माहिती असल्याशिवाय ती व्यक्ती तुमचे खास चॅट्स वाचू शकणार नाही.
हा ऑप्शन Chat Lock Settings सोबत उपलब्ध होणार आहे. यामध्ये लॉक असणारे चॅट्स हाईड करण्याचा पर्याय दिला आहे. सोबतच एक सीक्रेट कोडचा पर्यायही देण्यात येईल. तुम्ही एखादे चॅट लॉक केल्यानंतर त्याला हा सीक्रेट कोड लागू होईल. तसंच, चॅट अनलॉक केल्यास कोड हटवला जाईल.
या फीचरची सध्या चाचणी सुरू आहे. त्यामुळे काही बीटा यूजर्सना याचा अॅक्सेस देण्यात आला आहे. चाचणी पूर्ण झाल्यानंतर लवकरच हे फीचर सर्वांसाठी उपलब्ध करण्यात येईल. अर्थात, हे कधी होईल याबाबत कंपनीने कोणतीही माहिती अद्याप दिलेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.