WhatsApp Channels Update : व्हॉट्सअ‍ॅप चॅनल्समध्ये आले नवे अपडेट्स.. यूजर्सना मिळणार भन्नाट फीचर्स! जाणून घ्या

यामुळे ज्यांचं चॅनल आहे त्यांना फायदा होणार आहेच, मात्र इतर यूजर्सचा व्हॉट्सअ‍ॅप वापरण्याचा अनुभव देखील आणखी चांगला होणार आहे.
WhatsApp Channels Update
WhatsApp Channels UpdateeSakal
Updated on

WhatsApp Channels New Updates : व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या चॅनल्समध्ये काही नवीन अपडेट्स जारी केले आहेत. यामुळे ज्यांचं चॅनल आहे त्यांना फायदा होणार आहेच, मात्र इतर यूजर्सचा व्हॉट्सअ‍ॅप वापरण्याचा अनुभव देखील आणखी चांगला होणार आहे. यामध्ये व्हॉईस मेसेज, पोल्स आणि शेअर टू स्टेटस हे तीन नवे पर्याय दिले आहेत. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी याबाबत माहिती दिली. (Meta Mark Zuckerberg)

व्हॉट्सअ‍ॅपचे जगभरात दोन अब्जांहून अधिक यूजर्स आहेत. आपल्या यूजर्ससाठी कंपनी वेळोवेळी नवनवीन फीचर्स आणि अपडेट्स लाँच करत असते. गेल्या वर्षी चॅनल्स फीचर्स लाँच केल्यानंतर अल्पावधीतच यावर कित्येक यूजर्स आणि कंटेंट क्रिएटर्स दाखल झाले आहेत. कित्येक कंपन्यांनी देखील आपलं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल सुरू केलं आहे. सध्या चॅनल्सवर 600 मिलियनपेक्षा अधिक मंथली अ‍ॅक्टिव्ह यूजर्स आहेत.

नवे फीचर्स

नव्या फीचरमुळे आता व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवर यूजर्सना व्हॉइस मेसेज देखील पाठवता येमार आहे. चॅनल चालवणारे अ‍ॅडमिन्स इतर यूजर्सना हा मेसेज पाठवू शकणार आहेत. यामुळे कंटेंट क्रिएटर्स आपल्या फॉलोवर्सशी अधिक चांगल्या प्रकारे संवाद साधू शकतील.

व्हॉट्सअ‍ॅपने चॅनल्समध्ये आता पोल्स फीचरही अ‍ॅड केलं आहे. यामुळे कंपन्या किंवा कंटेंट क्रिएटर्स चॅनलमधील लोकांना एखाद्या गोष्टीबाबत बहुपर्याय देऊन, त्यांना काय आवडतं हे जाणून घेऊ शकणार आहेत.

सेंड टू स्टेटस या पर्यायामुळे आता यूजर्स एखाद्या चॅनलमधील फोटो किंवा व्हिडिओ थेट आपल्या स्टेटसला लावू शकणार आहेत. यामुळे त्यांना हा व्हिडिओ किंवा फोटो डाऊनलोड करुन, पुन्हा स्टेटसला अपलोड करण्याची गरज भासणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.