मुंबई : मेटा-मालकीच्या व्हाट्सअॅपने त्याच्या व्यवसाय अॅपसाठी एक प्रमुख अपडेट जारी केले आहे. व्हॉट्सअॅप बिझनेस अॅपचे वापरकर्ते आता अॅपमध्ये काहीही शोधू शकतील आणि अॅपवरूनच थेट खरेदी करू शकतील.
आता व्हॉट्सअॅप बिझनेस अॅपमध्ये ब्रँड किंवा व्यवसाय शोधला जाऊ शकतो. हे वैशिष्ट्य सध्या फक्त ब्राझील, कोलंबिया, इंडोनेशिया, मेक्सिको आणि यूकेमध्ये उपलब्ध आहे. भारतातील वापरकर्त्यांना आता प्रतीक्षा करावी लागणार आहे. हेही वाचा - महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....
या फीचरबाबत व्हॉट्सअॅपने एक ब्लॉगही शेअर केला आहे, ज्यामध्ये फीचर्सबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. नवीन अपडेटनंतर, तुम्ही कंपनी किंवा ब्रँडशी फक्त त्याच्या WhatsApp प्रोफाइलवर दिलेल्या नंबरवरूनच संपर्क साधू शकाल. याशिवाय तुम्ही अॅपमध्येच सर्च करून कोणत्याही कंपनीशी संपर्क साधू शकाल.
नवीन अपडेटनंतर व्हॉट्सअॅप बिझनेस अॅप एखाद्या ई-कॉमर्स साइटसारखे होईल. काहीही खरेदी करण्यासाठी तुम्हाला इतर कोणत्याही वेबसाइटला भेट देण्याची गरज नाही. तुम्ही थेट अॅपवरूनच कोणतीही वस्तू ऑर्डर करू शकाल. व्हॉट्सअॅपचे हे फीचर मुख्यत्वे JioMart च्या मॉडेलवर आधारित आहे.
व्यवसाय अॅपमध्येही वापरकर्त्यांची सुरक्षा आणि गोपनीयता अबाधित राहील, असे व्हॉट्सअॅपने म्हटले आहे. याशिवाय क्रेडिट आणि डेबिट कार्डने पेमेंट करण्याचा पर्यायही व्हॉट्सअॅपमध्ये आला आहे. व्हॉट्सअॅपच्या नवीन अपडेटचा विशेषत: ज्यांची स्वतःची ब्रँड वेबसाइट नाही त्यांना फायदा होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.