Whatsapp QR Code : QR कोड स्कॅन करा अन् हवी ती फाईल पाठवा; व्हॉट्सॲप चॅनलमध्ये आलेलं नवीन फीचर पाहिलंत काय?

Whatsapp Channel QR Code : WhatsApp Channels फॉलो करणं अधिक सुलभ होणार आहे, कारण कंपनीने QR कोडच्या साहाय्याने फॉलो करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.
Whatsapp Channel QR Code
Whatsapp Channel QR Codeesakal
Updated on

Whatsapp Channel QR Code Features : व्हॉट्सॲपने आपल्या वापरकर्त्यांसाठी अनुभव सुधारण्यासाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आणले आहे. आता WhatsApp Channels फॉलो करणं अधिक सुलभ होणार आहे, कारण कंपनीने QR कोडच्या साहाय्याने फॉलो करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.

WhatsApp Channels म्हणजे काय?

व्हॉट्सॲपने 2023 मध्ये WhatsApp Channels फीचर लाँच केले, जे इंस्टाग्राम किंवा X (पूर्वीचे ट्विटर) सारखे कार्य करते. या फीचरच्या माध्यमातून वापरकर्ते आपल्या आवडीच्या कंपन्या, सार्वजनिक व्यक्तिमत्वं किंवा इन्फ्लुएन्सर्सना फॉलो करू शकतात आणि त्यांचे अपडेट्स पाहू शकतात. मात्र, वापरकर्ते चॅनलला थेट उत्तर देऊ शकत नाहीत, फक्त इमोजीच्या माध्यमातून प्रतिक्रिया देण्याची सोय दिलेली आहे.

Whatsapp Channel QR Code
JioHotstar Owner : रिलायन्सचं टेंशन वाढवणारे जिओ हॉटस्टार डोमेनचे नवे मालक कोण? दुबईच्या २ भावंडांची होतीये चर्चा,नेमकं प्रकरण काय..

QR कोड फीचर कसं कार्य करेल?

WABetainfo नुसार, व्हॉट्सॲप लवकरच QR कोड फीचर सादर करत आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना लिंक शेअर करण्याची आवश्यकता राहणार नाही. आता वापरकर्ते QR कोड स्कॅन करून थेट चॅनल फॉलो करू शकतील, ज्यामुळे शेअरिंग प्रक्रिया अधिक जलद आणि सुलभ होईल.

Whatsapp Channel QR Code
IRCTC Vikalp Yojana : दिवाळीत घरी जायचंय पण रेल्वेचं बूकिंग फुल आहे? चिंता कशाला; 'या' योजनेतून मिळवा कन्फर्म तिकीट, पाहा सोपी प्रोसेस

कधी येणार QR फीचर?

सध्या हे फीचर बीटा टप्प्यात असून लवकरच पुढील अपडेट्समध्ये हे सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या फीचर द्वारे माहितीदेखील शेअर करता येईल अश्या अफवा आहेत. हे फीचर व्हॉट्सॲप वापरकर्त्यांसाठी आणि विशेष म्हणजे व्हॉट्सॲप चॅनलसाठी खूप जास्त फायद्याचे ठरणार आहेत. आता कधी हे फीचर अपडेटमध्ये येते आणि कसे काम करते,वापरकर्त्यांना किती आवडेल हे पाहणे रोमांचक ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.