मुंबई : मेटाच्या मालकीच्या इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने अलीकडेच एक प्रॉक्सी फीचर जाहीर केले आहे जे वापरकर्त्यांना इंटरनेट किंवा अॅप बंद असताना देखील संदेश पाठवू आणि प्राप्त करण्यास अनुमती देईल.
आता व्हॉट्सअॅप आणखी एका नवीन फीचरवर काम करत आहे. नवीन अपडेटनंतर, व्हॉट्सअॅपचे वापरकर्ते त्यांच्या अँड्रॉइड फोनचे चॅट सहजपणे दुसऱ्या अँड्रॉईड फोनवर ट्रान्सफर करू शकतील. हेही वाचा - प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....
विशेष बाब म्हणजे यासाठी चॅट बॅकअपची गरज भासणार नाही, म्हणजेच तुम्ही तुमच्या चॅटचा बॅकअप घेतला नसला तरीही तुम्ही चॅट दुसऱ्या फोनवर ट्रान्सफर करू शकाल. सध्या, व्हॉट्सअॅप चॅट्स फक्त क्लाउड अकाउंटवर बॅकअप घेतल्यासच ट्रान्सफर केल्या जातात. सध्या व्हॉट्सअॅप चॅट्सच्या बॅकअपसाठी गुगल ड्राइव्हची सुविधा उपलब्ध आहे.
व्हॉट्सअॅपच्या सर्व आगामी फीचर्सचा मागोवा घेणाऱ्या एका साइटने या नवीन फीचरची माहिती दिली आहे. व्हॉट्सअॅपच्या या फीचरची चाचणी व्हॉट्सअॅप अँड्रॉइडच्या बीटा व्हर्जन 2.23.1.26 वर केली जात आहे. नवीन फीचर अॅपच्या सेटिंग्ज टॅबमध्ये आढळू शकते. चॅट ट्रान्सफर करण्यासाठी QR कोड स्कॅन करणे आवश्यक आहे.
व्हॉट्सअॅपच्या या नवीन फीचरची सध्या बीटा व्हर्जनवर चाचणी केली जात असून हे फीचर कधी लॉन्च होणार आहे याबाबत स्पष्टता नाही. हे फीचर सुरू केल्यानंतर, Android चॅट्स ट्रान्सफर करणे खूप सोपे होईल, कारण बरेच लोक अजूनही त्यांच्या चॅटचा बॅकअप घेत नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.