WhatsApp DP Changing frequency : व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असं म्हणतात, ते आपल्याला आजूबाजूला कायमच बघायला मिळतं. हा प्रकार सोशल मीडियावर ॲक्टिव्ह लोकांविषयी कायम आढळतो. काही लोक ॲप सुरू केल्यानंतर पुन्हा त्या कडे बघतात की, नाही असा प्रश्न पडतो. तर काही लोक एवढे ॲक्टिव्ह असतात की, प्रत्येक तासाला, दिवसाला अपडेट मिळतात.
असेच काही लोक एकदा WhatsApp सुरू केल्यापासून जो फोटो लावलेला असतो तोच कायमचा ठेवतात तर काही लोक रोजच DP बदलतात. काय असते या मागचे सिक्रेट? स्वभावाचा यात काही समावेश असतो का? जाणून घेऊया
खरं तर कोणाच्या मनाच्या, स्वभावाचा पूर्ण थांग कोणाला लागत नाहीच. पण तरीही काही common गोष्टींवरून याचा अंदाज बांधता येतो. यात आधारावर करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचे निरीक्षणे जाणून घेऊया.
डीपी न बदलणारे:
मिनिमालिस्टिक स्वभावाचे असतात.
एकूणच काय स्वतःला आणि जवळच्या लोकांना जपणारे हे लोक असतात. साधी पण उच्च दर्जाची राहणी यांना आवडते. जास्तीत जास्त हे अंतर्मुख स्वभावाचे असतात. वाढदिवस, लग्न सभारंभ टाळणारे (मुख्यत्वे नाचणे टाळायचे म्हणून) हे लोकं असतात. एवढेच काय तर फोटो घ्यायला सुद्धा टाळतात, यांच्याच स्वतःच्या फोन मध्ये यांचे स्वतःचे फोटो कमी असतात. दुसऱ्याच्या फोन मध्ये कोणी काढले असतील तर ते फोटो कसे असतील अन् त्यांनी ते कुठे शेअर नाही केले पाहिजे असं यांना वाटते.
वारंवार डीपी बदलणारे:
मूडी, हौशी स्वभावाचे असतात.
एकूणच ही लोकं बहिर्मुख किंवा अंतर्मुख काहीही असो, स्वच्छंदी असतात. नेहमी active असणारे तर कधी खूप नैराश्यात असणारे हे लोक असतात. Active असणारे स्वतःला active दाखवायला स्वतःचे dp वारंवार बदलतात तर नैराश्यात असणारे लोक जगासमोर एखाद मुखवटा (खरा किंवा खोटा) दाखवायला बदलत असतात.
लग्न, वाढदिवस, यात्रा, महोत्सव यांच्या आवडीची ठिकाणे आहेत. बिन्धास्त आणि बेलगाम सुद्धा यांना म्हटले जाते, कुठे गेल्यावर सर्वात आधी नाचायला सुरू करणारे हेच असतील, एवढंच काय तर वरच्या प्रकारातील लोकांना सुद्धा जबरदस्ती ओढतील. एखाद अंतर्मुख व्यक्ती यांनी दत्तक घेतलेला असतोच.
अंतर्मुख लोकं सुद्धा कधी कधी वारंवार बदलतात पण ते सोशल प्रोटोकॉल म्हणून किंवा जीवनात महत्वाचं काही वाटते म्हणून.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.