Whatsapp New Feature : व्हॉट्सअ‍ॅपने दिलं नवीन सरप्राईझ! व्हिडीओ कॉलसाठी आणलं धमाकेदार फिचर; इफेक्ट्स,अवतार आणि बरंच काही,जाणून घ्या

Whatsapp Update : पुढच्या अपडेटमध्ये येणार नवीन फिचर,भन्नाट कल्पना आणि व्हिडीओ कॉलचा आनंद होणार दुप्पट
WhatsApp to Roll Out Exciting AR Features for Video Calls
WhatsApp to Roll Out Exciting AR Features for Video Callsesakal
Updated on

Whatsapp Video Call : व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांसाठी नेहमीच काहीतरी अनोखे फीचर्स घेऊन येत असते.आता तुमच्या कॉलिंग अनुभवात वाढीव वास्तववादीपणा (Augmented Reality - AR) तंत्रज्ञानाचा वापर करून आणखी मजेदार फिचर लाँच करत आहे. म्हणजेच, लवकरच तुमच्या व्हिडिओ कॉलमध्ये तुम्ही स्पेशल इफेक्ट्स आणि फिल्टर्स वापरू शकणार आहात.

Snapchat आणि Apple नंतर आता व्हॉट्सअ‍ॅप ही सुविधा घेऊन येत आहे. याआधी स्नॅपचॅटने 'लेन्स' आणि Apple ने 'फेसटाइम' (Facetime) मध्ये AR इफेक्ट्स आणले होते. व्हॉट्सअ‍ॅपच्या Android 2.24.13 च्या बीटा आवृत्तीत या नवीन फीचरवर काम सुरू असल्याची माहिती WABetaInfo ने दिली आहे.

या AR इफेक्ट्समुळे कॉल अधिक आकर्षक आणि मनोरंजक बनतील. तुमच्या चेहऱ्यावर मजेदार फिल्टर्स वापरता येतील, जसे की त्वचा अधिक स्वच्छ दिसण्यासाठी ब्यूटीफाय फिल्टर किंवा कमी प्रकाशात चांगले दिसण्यासाठी लो-लाइट मोड असेल. आता AR व्हिडिओ कॉलमुळे तुमच्या प्रियजनांशी अधिक अधिक चांगल्या प्रकारे संवाद साधता येईल.

WhatsApp to Roll Out Exciting AR Features for Video Calls
Flipkart Minutes : 15 मिनिटात वस्तू तुमच्या हातात; झेप्टो, ब्लिंकिटशी स्पर्धा करण्यासाठी फ्लिपकार्टची 'Minutes' सेवा होतीये लाँच

व्हॉट्सअ‍ॅप केवळ इथेच थांबणार नाही. भविष्यात येणाऱ्या अपडेटमध्ये कॉल दरम्यान बॅकग्राउंड बदलण्याची सुविधाही मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच, तुमच्या नेहमीच्या कंटाळवाण्या बॅकग्राउंड ऐवजी एखादा रंगीबेरंगी किंवा मजेदार बॅकग्राउंड वापरून कॉल अधिक आनंददायक बनवता येणार आहेत.

WhatsApp to Roll Out Exciting AR Features for Video Calls
Proba-3 Mission : सूर्याला लागणार आर्टिफिशियल ग्रहण; इस्रो प्लॅन करतंय मोहीम, या दोन उपग्रहांचं होणार लाँचिंग,जाणून घ्या

त्याचबरोबर व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉल अधिक मनोरंजक करण्यासाठी इतरही काही इफेक्ट्स आणण्याच्या विचारात आहे. WABetaInfo नुसार, लवकरच तुम्ही तुमच्या वास्तविक व्हिडिओ फीडऐवजी तुमचा अवतार वापरण्याची सुविधा मिळणार आहे. यामुळे तुम्ही तुमची ओळख आणि डीपी हाईड करू शकता किंवा तुमच्या आवडीचे अवतार वापरून कॉलमध्ये अधिक क्रिएटिव्ह दिसू शकता. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर हा अवतार पर्याय तुमच्या प्रायव्हसीसाठीही उपयुक्त ठरू शकेल.

या नव्या फीचर्समुळे व्हाट्सअप वापरण्याचा आपला अनुभव नक्कीच मजेदार बनणार आहे यात शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.