Whatsapp QR Chat : व्हॉट्सअॅप नेहमीच आपल्या यूजर्सचा अनुभव सुधारण्यासाठी नवीन फीचर्स आणत असते.त्यामध्ये चॅट पिनींग,व्हॉइस स्टेटसच्या वेळेत वाढ आणि बरेचशे फीचर्स कंपनीने लाँच गेले आहेत.आता त्यामागोमाग कंपनी अजून एक नवीन फिचर टेस्ट करत असल्याची माहिती समोर आली आहे. आता कंपनी चॅट हिस्ट्री एका फोनवरून दुसऱ्या फोनवर ट्रांसफर करण्याची प्रक्रिया आणखी सोपी करणार आहे. यासाठी ते क्यूआर कोडचा वापर करणार आहेत.
आत्तापर्यंत आपल्याला गूगल ड्राइव्हवर चॅट हिस्ट्रीचा बॅकअप घ्यावा लागायचा होता आणि नंतर नवीन फोनवर पुन्हा रिस्टोर करावा लागायचा होता. ही थोडीशी वेळ घेणारी आणि त्रासदायक प्रक्रिया होती. पण, आता क्यूआर कोड स्कॅन करून तुम्ही सहजतेने तुमची संपूर्ण चॅट हिस्ट्री नवीन फोनवर ट्रांसफर करू शकणार आहे.
WABetaInfo यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सแอपच्या लेटेस्ट बीटा व्हर्जनमध्ये (2.24.9.19) ही नवी सुविधा चाचणीच्या स्वरुपात उपलब्ध आहे. यात जुन्या फोनवर एक क्यूआर कोड दिसणार. या कोडमध्ये तुमची संपूर्ण चॅट हिस्ट्री आणि डेटा असेल. तुम्हाला फक्त तुमच्या नवीन फोनवर हा कोड स्कॅन करायचा आहे आणि तुमची चॅट हिस्ट्री सहजतेने ट्रांसफर होईल.
ही सुविधा अँड्रॉइड आणि iOS दोन्ही यूजर्ससाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. अजूनपर्यंत या फीचरची अधिकृत घोषणा झालेली नाहीये पण, बीटा व्हर्जनमध्ये असल्यामुळे लवकरच सगळ्यांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.