WhatsApp वर आश्‍चर्यकारक फीचर! ग्रुप व्हिडिओमध्ये थेट ग्रुप चॅटिंग

WhatsApp वर येतेय आश्‍चर्यकारक फीचर! कॉल मिस झाल्यानंतरही येणार नाही अडचण
whatsapp
whatsappSakal
Updated on
Summary

कंपनीने वापरकर्त्याचा कॉल एक्‍स्पिरियन्स वाढवण्यासाठी अलीकडेच आपल्या ग्रुप व्हिडिओ सर्व्हिसमध्ये एक नवीन फीचर जोडले आहे.

WhatsApp ने आपल्या वापरकर्त्यांसाठी नवीन अद्यतने जारी करणे सुरू ठेवले आहे. कंपनीने वापरकर्त्याचा कॉल एक्‍स्पिरियन्स वाढवण्यासाठी अलीकडेच आपल्या ग्रुप व्हिडिओ सर्व्हिसमध्ये (Group Vedio Service) एक नवीन फीचर जोडले आहे. कंपनीने आपल्या जॉइनेबल कॉल फीचरचा विस्तार केला आहे, ज्यात वापरकर्त्यांना चालू असलेल्या ग्रुप व्हिडिओमध्ये थेट ग्रुप चॅटिंगही करता येऊ शकते. नवीन अपडेट वापरकर्त्यांना ग्रुप चॅट टॅबवरून सुरू असलेल्या ग्रुप कॉलमध्ये सामील होण्याचा पर्याय देईल. यावर्षी जुलैमध्ये WhatsApp वर जॉइनेबल कॉल प्रथम सादर करण्यात आले. इन्स्टंट मेसेजिंग ऍपने आता WhatsApp ग्रुपमध्ये एकत्रित करून या फीचरमध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत.

whatsapp
नोकियाचा सर्वात स्वस्त 5G फोन Nokia G300 लॉंच, पाहा किंमत

WhatsApp च्या जॉइनेबल कॉल फीचरमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. वापरकर्ता आता ग्रुप चॅट विंडोमधून चालू असलेल्या WhatsApp ग्रुप कॉलमध्ये सामील होऊ शकतो. सर्व चालू असलेले ग्रुप व्हिडिओ आणि व्हॉईस कॉल आता तुमच्या चॅटिंगमध्ये देखील दिसतील जे तुम्ही सहजपणे पाहू शकता आणि ऍप उघडताच सामील होऊ शकता.

एकदा ग्रुप कॉल सुरू केल्यानंतर वापरकर्ते त्वरित किंवा त्यांच्या मोकळ्या वेळेमध्ये सामील होऊ शकतात. नंतर जॉइन होणाऱ्याला ग्रुप चॅटमध्ये जॉइन बटणासह एक स्वतंत्र टॅब दिसेल, ते कॉलमध्ये येण्यासाठी त्यावर टॅप करू शकतात. WhatsApp म्हणते की, कॉल नोटिफिकेशनमध्ये सहभागीच्या नावाऐवजी ग्रुपचे नाव लिहिले जाईल. हे लक्षात घेण्यासारखे आहे, की संबंधित WhatsApp ग्रुपचा भाग असलेले लोकच चालू असलेल्या ग्रुप कॉलमध्ये सामील होऊ शकतात. WhatsApp म्हणते की, कॉलला आता थोडी वेगळी रिंगटोन देखील मिळेल.

नवीन वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी आणि प्लॅटफॉर्मवर विद्यमान वापरकर्त्यांची गोपनीयता सुनिश्‍चित करण्यासाठी WhatsApp नवनवीन फीचर्स जोडत आहे. अलीकडेच अँड्रॉइड आणि iOS वापरकर्त्यांसाठी Google Drive आणि iCloud संग्रहित बॅकअपसाठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन आणणे सुरू केले. मेसेजिंग प्लॅटफॉर्म आपल्या सध्याच्या व्हॉइस मेसेज फंक्‍शनला ग्लोबल व्हॉईस मेसेज प्लेअरसह अपग्रेड करत आहे.

whatsapp
'iPhone 13'साठी आता दीर्घ प्रतीक्षा! 'यामुळे' घटली Apple ची उत्पादने

जाणून घ्या ग्रुप कॉलमध्ये जॉईन होण्याबाबत

जर तुम्ही ग्रुप व्हॉइस किंवा व्हिडिओ कॉलकडे दुर्लक्ष केले असेल, तर तुम्हाला WhatsApp वरील ग्रुप चॅटमधून थेट कॉलमध्ये सामील होण्याचा पर्याय दिसेल. वापरकर्त्यांना एक नोटिफिकेशन दिसेल, ज्यात त्या ग्रुपमध्ये किती लोकांचा समावेश आहे, या नावांऐवजी ग्रुपचे नाव दाखवले जाईल. जॉइन बटण स्क्रीनवर दिसेल ज्याद्वारे तुम्ही सामील होऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.