WhatsApp New Features : व्हॉट्सअ‍ॅप लवकरच आणणार नवे फिचर्स, स्टेटसला रिप्लाय देण्याचा अनुभव बदलणार

स्टेटस बार संदर्भातील नव्या फिचर्सवर कंपनी काम करत आहे.
WhatsApp New Features
WhatsApp New Featuresesakal
Updated on

WhatsApp New Features : मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावरील दिग्गज कंपनी व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या फिचर्सवर काम करत आहे. बऱ्याच दिवसांपासून याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. आता स्टेटस बार संदर्भातील नव्या फिचर्सवर कंपनी काम करत आहे.

जेव्हा आपण स्टेटस टॅबमध्ये एखाद्या व्यक्तीचे स्टेटस पाहतो, तेव्हा त्याला रिप्लाय करण्यसाठी आपल्याला त्या रिप्लाय टॅबवर क्लिक करून मग रिप्लाय द्यावा लागतो.

मात्र, आता त्या रिप्लाय टॅबवर क्लिक करण्याची गरज पडणार नाही. कारण, लवकरच आपल्याला रिप्लाय बार दिसणार आहे. त्यावरच व्हॉट्सअ‍ॅप कंपनीचे काम सुरू आहे.

रिप्लाय बारचा पर्याय डिफॉल्ट मिळाल्यामुळे तुम्हाला कुठे ही क्लिक करण्याची गरज पडणार नाही. या नव्या फिचरमुळे तुम्ही त्या रिप्लाय बारमध्ये मेसेज टाईप करून त्या व्यक्तीला थेट रिप्लाय देऊ शकणार आहात. व्हॉट्सअ‍ॅप कंपनीच्या या फिचर्सबद्दलची माहिती Wabetainfo या वेबसाईटने शेअर केली आहे.

WhatsApp New Features
Nothing Phone 2 : नथिंग कंपनीचं ग्राहकांना ख्रिसमस गिफ्ट! 'फोन-2'च्या किंमतीत मोठी सूट..

नवे फिचर इन्स्टाग्रामप्रमाणे काम करेल

व्हॉट्सअ‍ॅपचे हे नवे फिचर्स बीटा टेस्टर्सना Android आणि iOS वर मिळाले असल्याची माहिती Wabetainfo या वेबसाईटने दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या फिचर्समुळे युझर्सना आणखी चांगला अनुभव मिळणार असून स्टेटसला रिप्लाय देणे देखील आणखी सुलभ आणि सोपे होणार आहे.

विशेष म्हणजे हे फिचर इन्स्टाग्राम प्रमाणेच काम करेल. जिथे तुम्ही स्टोरी पाहिल्यावर तुम्हाला डिफॉल्टनुसार रिप्लायचा पर्याय मिळतो.

व्हिडिओ कॉल दरम्यान म्युझिक ऐकायला मिळणार

व्हॉट्सअ‍ॅपची पॅरेंट कंपनी असलेली मेटा कंपनी लवकरच व्हॉट्सअ‍ॅपसाठी एक मस्त फिचर आणणार आहे. हे फिचर व्हिडिओ कॉलशी निगडीत असणार आहे.

हे फिचर व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडिओ कॉल करताना वापरता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून व्हिडिओ कॉलवर ऑफिसच्या मीटिंग्स घेतल्या जातात. काही वेळा या ऑफिस मीटिंग बोरिंग आणि कंटाळवाण्या असतात.

त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडिओ कॉल दरम्यान, म्युझिक ऐकण्याची परवानगी मिळेल. Wabetainfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅपच्या या नवीन फिचरवर कंपनीचे काम चालू आहे. अद्याप हे फिचर बीटा टेस्टरसाठी उपलब्ध करण्यात आलेले नाही.

पंरतु, मेटा शक्य तितक्या लवकर हे फिचर चांगल्या प्रकारे डेव्हलप करण्याच्या आणि त्यावर चाचणी घेण्याच्या तयारीत आहे. त्यानंतर, हे नवे फिचर लॉंच केले जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.