WhatsApp IP Address : व्हॉट्सअ‍ॅपने लाँच केलं नवीन फीचर; पण सायबर गुन्हेगारांना होणार याचा फायदा! जाणून घ्या

WhatsApp New Feature : कित्येक देशांनी आणि सायबर तज्ज्ञांनी या फीचरला विरोध दर्शवला आहे.
WhatsApp New Feature IP Address
WhatsApp New Feature IP AddresseSakal
Updated on

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या यूजर्ससाठी वेळोवेळी नवीन फीचर लाँच करत असते. मात्र, कंपनीने आता एक असं फीचर आणलं आहे, जे कदाचित सायबर गुन्हेगारांनाच फायद्याचं ठरू शकतं. व्हॉट्सअ‍ॅपच्या या फीचरमुळे आता यूजर्स आपला आयपी अ‍ॅड्रेस लपवू शकणार आहेत. कित्येक देशांनी आणि सायबर तज्ज्ञांनी या फीचरला विरोध दर्शवला आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या या फीचरला "Protect IP address in Call" असं नाव देण्यात आलं आहे. यामुळे एखादा कॉल करताना, यूजर आपला आयपी अ‍ॅड्रेस लपवू शकणार आहे. त्यामुळे हा कॉल नेमका कुठून आला आहे, याबाबत कोणतीही माहिती मिळू शकणार नाही. यामुळे कॉल करणाऱ्या व्यक्तीला ट्रॅक करणं अशक्य होणार आहे.

WhatsApp New Feature IP Address
WhatsApp Safety : तुमचं व्हॉट्सअ‍ॅप भलतंच कोणी वापरतंय? अकाउंट सेफ ठेवण्यासाठी लगेच चेक करा 'या' गोष्टी

आयपी अ‍ॅड्रेस म्हणजे काय?

एखाद्या फोन किंवा कम्प्युटरची लोकेशन ट्रेस करण्यासाठी आयपी अ‍ॅड्रेस ही गोष्टी अगदी महत्त्वाची ठरते. याच गोष्टीमुळे सायबर गुन्हेगारांना पकडण्यास मदत होते. हा यूजरच्या मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेटमध्ये असणारा एक 12 अंकी युनिक कोड असतो. (Tech News)

सायबर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी महत्त्वाचं शस्त्र असणारा हा IP Address जर लपणार असेल; तर ही स्कॅमर्सना मोठी मदत ठरणार आहे. यामुळे धमकी, खंडणी आणि फसवणुकीचे फोन ट्रेस किंवा ट्रॅक करणं अवघड जाईल. त्यामुळेच कित्येक देश आणि सायबर तज्ज्ञ हे फीचर मागे घ्यावं अशी मागणी करत आहेत. मात्र, व्हॉट्सअ‍ॅपने अद्याप यावर कोणतीही प्रक्रिया दिलेली नाही.

WhatsApp New Feature IP Address
Allahabad HC : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लाईक करणे गुन्हा नाही; हायकोर्टाचा निर्वाळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.