पुणे - नव्या वर्षात व्हॉटसअॅपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीमुळे बऱीच उलट सुलट चर्चा झाली. युजर्सनी व्हॉटसअॅपला पर्यायसुद्धा शोधले. यानंतर व्हॉटसअॅपने युजर्सना त्यांचा डेटा शेअर करणार नसल्याचंही सांगितलं. आता कंपनीने नवीन अपडेट आणले असून यामुळे डेस्कटॉपवरून व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलिंग करता येणार आहे. यासाठी व्हॉटसअॅप वेबवर हे फीचर मिळणार आहे. युजर्सना व्हॉटसअॅप वेबच्या माध्यमातून डेस्कटॉपवरून व्हिडिओ कॉल आणि ऑडिओ कॉल करता येईल. सध्या हे फीचर काही युजर्सना देण्यात आलं असून याचे टेस्टिंग सुरू आहे.
कोरोनामुळे जगभरात लॉकडाऊन करण्यात आले होते. तेव्हा व्हिडिओ कॉलिंगचे फीचर सर्वाधिक वापरण्यात आलं होतं. घरामध्ये अडकून पडलेले आणि वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांनी व्हिडिओ कॉलचा वापर केला. व्हॉटसअॅपमध्ये मात्र फक्त मोबाईलवरूनच व्हिडिओ, ऑड़िओ कॉल करण्याची सुविधा होती. त्यामुळे लोकांनी डेस्कटॉप कॉलिंगसाठी झूम आणि गूगल मीटचा वापर केला.
आता व्हॉटसअॅच्या डेस्कटॉप व्हर्जनवरूनही व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलिंग फीचर वापरता येणार आहे. जर लवकर हे फीचर लाँच झालं तर झूम आणि गूगल मीटला जोरदार टक्कर बसेल असं म्हटलं जात आहे.
व्हॉटसअॅपच्या नव्या फीचरची माहिती WABetaInfo ने दिली आहे. त्यात म्हटलं आहे की, व्हॉटसअॅपने डेस्कटॉपवरून व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलिंग फीचर रोलआउट केलं आहे. यासोबत काही स्क्रीनशॉटही शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये व्हॉटसअॅपच्या डेस्कटॉप व्हर्जनवर ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंग फीचर दिसत आहे.
सध्या फक्त बीटा व्हर्जनसाठी रोलआउट केलं आहे. यासाठी मोजक्याच युजर्सना सध्या ते वापरता येणार आहे. व्हॉटसअॅपने पहिल्यांदाच घोषणा केली होती की 2021 मध्ये युजर्सना डेस्कटॉपवर कॉलिंग फीचर देण्यात येईल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.