WhatsApp Special Feature : आता व्हिडिओ कॉल सुरू असतानाही ऐकता येणार गाणी; व्हॉट्सअ‍ॅप आणतंय खास फीचर

यासोबतच व्हॉट्सअ‍ॅपने Disappearing Audio Message हे फीचर सर्वांसाठी लाँच केलं आहे.
WhatsApp New Feature
WhatsApp New FeatureeSakal
Updated on

WhatsApp New Feature : कोरोना नंतर कित्येक कंपन्यांनी वर्क-फ्रॉम होम सुरू केलं होतं. यानंतर आताही कंपन्या ऑनलाईन मीटिंग्स अरेंज करतात. या मीटिंग्स बऱ्याच वेळा व्हॉट्सअ‍ॅपवर देखील होतात. कित्येक वेळा या मीटिंग्स अत्यंत रटाळ असतात. मात्र, कॉल सुरू असल्यामुळे आपण दुसरं काहीही करू शकत नाही. यावर आता व्हॉट्सअ‍ॅपने एक खास उपाय शोधला आहे.

लवकरच कंपनी असं फीचर लाँच करणार आहे, ज्यामुळे व्हिडिओ कॉल सुरू असतानाही तुम्ही गाणी ऐकू शकणार आहात. WaBetaInfo या वेबसाईटने याबाबतची माहिती दिली आहे. हे फीचर सध्या डेव्हलपिंग फेजमध्ये असून, अद्याप बीटा टेस्टरसाठी देखील हे उपलब्ध झालेलं नाही. मात्र, यावर वेगात काम सुरू असल्याचं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

स्क्रीन शेअर

विशेष म्हणजे, व्हिडिओ कॉल सुरू असताना जर यूजरने स्क्रीन शेअर केली तरीदेखील गाणं सुरू राहणार आहे. यासाठी व्हिडिओ कॉल सुरू झाल्यानंतर स्क्रीनवर खालच्या बाजूला यासाठी ऑप्शन मिळेल. एवढंच नाही, तर कॉलवर असणाऱ्या दोन्ही किंवा सर्व व्यक्तींना हे म्युझिक ऐकू जाईल असा पर्यायही याठिकाणी देण्यात येण्याची शक्यता आहे. म्हणजेच, दोन मित्र व्हिडिओ कॉलवर एकत्र एक गाणं ऐकू शकणार आहेत.

WhatsApp New Feature
WhatsApp Username Feature : आता 'यूजरनेम' वापरुन सर्च करता येणार व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट, मोबाईल नंबरची नाही गरज

डिसअपिअरिंग ऑडिओ मेसेज

व्हॉट्सअ‍ॅपने Disappearing Audio Message हे फीचर सर्वांसाठी लाँच केलं आहे. ज्याप्रमाणे फोटो आणि व्हिडिओ हे वन-टाईम पाठवता येतात, त्याचप्रमाणे आता ऑडिओ मेसेज देखील एकदा ऐकल्यानंतर आपोआप डिलीट होणार आहेत. यामुळे यूजर्सना आणखी प्रायव्हसी मिळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()