मेटाच्या मालकीचे WhatsApp हे इंस्टंट मॅसेजिंग ॲप वापरकर्त्यांसाठी सतत काहीतरी नवीन फीचर्स घेऊन येत असतं. WhatsApp चा वापर करणे अत्यंत सोपे असल्याने जगभरात याचे कोट्यावधी वापरकर्ते आहेत. दरम्यान पुन्हा व्हॉट्सॲप एका नवीन फीचरवर काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. आता वापरकर्ते ग्रुप चॅटमध्ये पोल घेऊ शकणार आहेत. व्हॉट्सॲप लवकरच तुम्हाला ग्रुपमध्ये पोल प्रश्न टाइप करण्याचा ऑप्शन मिळू शकतो. सध्या तुम्हाला हा पर्याय फक्त टेलिग्राम आणि ट्विटर सारख्या प्रतिस्पर्धी चॅट Apps मध्येच पाहायला मिळतो.
WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, तुम्हाला लवकरच व्हॉट्सअॅपवर ग्रुप चॅटमध्ये पोल प्रश्न टाइप करता येणार आहे. दरम्यान प्रतिस्पर्धी चॅट ॲप टेलिग्राम आणि ट्विटरवरही हे फीचर आधीच उपलब्ध आहे. रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की व्हॉट्सअॅप हे फीचर आपल्या यूजरबेससाठी देखील रोल आउट करू शकते. या रिपोर्टमध्ये एक स्क्रीनशॉट देखील शेअर करण्यात आला आहे, जो iOS वर पोल ऑप्शन फीचर दिसत आहे. हे ॲपv2.22.6.70 बीटा वर पाहाण्यात आले होते आणि ते अद्याप सर्व बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध नाही.
व्हॉईस कॉलिंगमध्ये असेल नवीन इंटरफेस
WhatsApp काही बीटा Android वापरकर्त्यांसाठी व्हॉइस कॉलिंगसाठी नवीन इंटरफेसवर देखील काम करत आहे. नवीन इंटरफेस Android आणि iOS दोन्ही वापरकर्त्यांसाठी आणला जाईल, परंतु सध्या बीटा Android वापरकर्त्यांसाठी टेस्टिंग केली जात आहे. त्यामुळे लवकरच आपल्याला व्हॉईस कॉलिंगमध्ये नवीन इंटरफेस मिळेल.
रिअल-टाइम व्हॉईस वेव्हफॉर्म
iOS आणि Android वापरकर्त्यांसाठी WhatsApp कॉलसाठी मागील बीटा अपडेटमध्ये डिझाइन बदलाचे संदर्भ आधीच दिले आहेत . नवीन WhatsApp व्हॉईस कॉल इंटरफेस समोर आणि मध्यभागी एक गोलाकार राखाडी चौकोनासह येईल. यामध्ये संपर्क नाव, नंबर आणि प्रोफाइल पिक्चर देखील असेल. व्हॉट्सॲप कॉलसाठी रिअल-टाइम व्हॉईस वेव्हफॉर्म सादर करण्याचा विचार करत आहे, ज्यामुळे कॉलर कोण बोलत आहे हे कळू शकेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.