WhatsApp वरून सगळ्या मित्रांना एकाच वेळी करा Happy New Year, ट्राय करा ही ट्रीक

दोन दिवसात नवीन वर्ष सुरू होणार आहे. अशा वेळी आपणच सगळ्यात आधी विश करावं असं अनेकांना वाटत असतं. त्यांच्यासाठी ही खास ट्रीक.
whatsapp
whatsappesakal
Updated on

Send New Year Wishes At A Time To All Friends on WhatsApp : लवकरच आपण २०२२ ला बाय करून नवीन वर्षाला वेलकम करणार आहोत. अशात आप्तेष्टांना शुभेच्छा देण्याची सर्वांनाच घाई असते. अशा वेळी आपणच सगळ्यात आधी विश करावं असं अनेकांना वाटत असतं. पण WhatsApp वरून ५ पेक्षा जास्त लोकांना एकाचवेळी विश करता येत नाही. अशावेळी एकाच वेळी सगळ्या मित्रांना मेसेज पाठवता यावा यासाठी सोपी ट्रीक सांगणार आहेत.

सामान्यतः आपण काही ऑफिशियल काम असेल तरच ब्रॉडकास्ट लिस्ट बनवतो आणि मेसेज पाठवतो. पण आता नवीन वर्षात आप्तेष्टांना शुभेच्छा देण्यासाठीही ही ट्रीक वापरता येईल.

whatsapp
WhatsApp Tips: दोन स्मार्टफोनमध्ये वापरता येईल एकच WhatsApp अकाउंट, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

फॉलो करा या स्टेप्स

  • WhatsApp उघडल्यावर उजव्या हाताला वरच्या बाजूला जे तीन डॉट दिसतात त्यावर क्लिक करा.

  • तिथे New Broadcast ऑप्शन दिसेल. तो सिलेक्ट करा.

  • त्यानंतर तिथे फोन मधले सर्व काँटॅक्ट्स दिसतील. एक एक करून हवे ते नंतर सिलेक्ट करा.

whatsapp
Whatsapp Service : पुणे महापालकेची व्हॉट्सअ‍ॅप सेवा विस्तारणार
  • मग स्क्रीनवर दिसणारे ग्रीन बटन क्लिक करा. मग ग्रुप इंटरफेस सारखं ओपन होईल.

  • त्यावर तुम्हाला हवा तो मेसेज टाईप करा. आणि सेंड करा.

  • त्यानंतर तुम्ही पाठवलेल्या व्यक्तीला हा मेसेज इंडिव्हिज्युअल चॅटवर दिसेल. ब्रॉडकास्ट केला आहे हे त्यांना समजणारही नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.