इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपवर आता तुम्हाला तारखेनुसार मॅसेज बघता येणार आहेत. व्हॉट्सॲपच्या नवीन फीचर ट्रॅकिंग वेबसाइट WABetaInfo ने या नव्या फीचर्सची माहिती दिली आहे.व्हॉट्सॲपच्या या फीचरचं नाव आहे 'सर्च मेसेज बाय डेट' व्हॉट्सॲपने सध्या याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाहीये. मात्र लवकरच या फीचरची घोषणा होण्याची शक्यता आहे. अलीकडेच व्हॉट्सॲपच्या लिंक केलेल्या डिव्हाईसवरून स्वतःलाचं मेसेज पाठवण्याच्या फीचरची मार्केट मध्ये चर्चा होती.
हे फिचर नेमकं काम कसं करत?
तर WABetaInfo ने पब्लिश केलेल्या रिपोर्टनुसार, मेटाव्हर्स ही कंपनी सध्या या फिचरवर काम करते आहे. हे फीचर लवकरच युजर्ससाठी लाँच केलं जाईल.
या फिचरमुळे तुम्हाला व्हॉट्सॲपवरचे जुने मॅसेज तारखेनुसार पाहता येणार आहेत. बऱ्याचदा यूजर्स लाँग चॅट हिस्ट्रीमुळे वैतागतात. त्यांना एखाद्या विशिष्ट दिवसाचा मॅसेज हवा असेल तर खूप जास्त स्क्रोल करावं लागतं. कधीकधी ग्रुप चॅट हिस्ट्री मध्ये जाऊन काही शोधायचं असेल तर ते सुद्धा शक्य होत नाही. अशावेळी हे फिचर आल्यावर तुमचा त्रास कमी होऊ शकतो.
व्हॉट्सॲपवर तुम्हाला एक कॅलेंडर आयकॉन मिळेल, तुम्ही या आयकॉनवर क्लिक करून तारीख सिलेक्ट करू शकता आणि मॅसेज पाहू शकता.
आता स्वतःलाच पाठवा मॅसेज..
अलीकडेच बातमी आली होती की व्हॉट्सॲप स्वतःला लिंक केलेल्या डिव्हाइसेसवरून मॅसेज पाठविण्याची परमिशन देण्यावर काम करत आहे. म्हणजेच या फीचरमध्ये युजर्स लिंक केलेल्या डिव्हाईसवरून स्वतःला मेसेज पाठवू शकतील. हे फिचर iOS आणि Android युजर्ससाठी उपलब्ध असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.