Whats App Feature : व्हॉट्सअॅपमध्ये नवीन फीचर्सची सतत भर पडत असते. आता लवकरच व्हॉट्सअॅपमध्ये एक नवीन फीचर पहायला मिळणार आहे. या फीचरच्या मदतीने वापरकर्ते स्टिकर्समध्ये त्यांच्या अवतारचा वापर स्टिकर म्हणून कोण करू शकणार? हे निवडू शकणार आहेत.
या नव्या फिचरमध्ये युझरला माय कॉन्टॅक्ट्स, सिलेक्टेड कॉनटॅक्ट्स आणि नोबडी असे ३ पर्याय निवडण्याची सुविधा मिळणार आहे. जर युझर्स आणि त्यांचे कॉन्टॅक्ट्स दोघांनी जर हे फिचर अॅक्टिव्हेट केले तर या दोघांच्या अवतारातील स्टिकर्स त्यांना चॅटमध्ये पहायला मिळतील.
WABetaInfo या पोर्टलच्या एका रिपोर्टनुसार, हे नवे अवतार फीचर लवकरच येऊ शकते. ज्यामध्ये युझर्स त्यांच्या अवतार स्टिकर्सचा वापर कोण करू शकते? हे ठरवू शकणार आहे. तसेच, हे फीचर नियंत्रित करू शकतील. यासोबतच युझर्सचे अवतार स्टिकर्स हे त्याच लोकांपुरते मर्यादित असतील, ज्यांच्यावर त्यांचा विश्वास आहे.
विशेष म्हणजे बीटा टेस्टर्स या फीचरचे अपडेट व्हर्जन २.२४.६.८ वर वापरू शकतात. व्हॉट्सअॅपचे हे नवे फीचर वापरण्यास सोपे आणि मजेशीर असण्याची शक्यता आहे. या अनोख्या फीचरमुळे चुकीच्या गोष्टी घडण्याची शक्यता कमी होईल आणि गोपनियता देखील राखली जाईल.
त्यामुळे, हे नवे फीचर तरूणाईच्या पसंतीस पडेल यात काही शंका नाही. यापूर्वी युझर्सकडून बनवण्यात आलेल्या स्टिकर्सवर कोणतेही नियंत्रण ठेवले जात नव्हते. मात्र, या नव्या फीचरमुळे नियंत्रण ही राखले जाईल आणि गोपनियताही पाळली जाईल.
हे फीचर कधी लॉंच होणार? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, व्हॉट्सअॅप लवकरच हे फीचर लाँच करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यापूर्वीच्या एका रिपोर्टमध्ये व्हॉट्सॲपच्या स्टिकर एडिटर फीचरचाही उल्लेख करण्यात आला होता. ज्यामध्ये युझर्स कोणत्याही थर्ड पार्टी ॲपशिवाय स्टिकर्स एडिट करू शकतात. व्हॉट्सॲपचे हे फीचर iOS च्या 24.1.10.72 मध्ये देण्यात आले आहे. आता या नव्या फीचरमुळे अवतार स्टिकर्स वापरण्याचा युझर्सचा अनुभव हा आणखी मजेशीर होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.