Whatsapp Colour Change : व्हॉट्सॲप होणार कलरफुल; अपेडटमध्ये आलं नवीन फीचर,एकदा बघाच

WhatsApp Introduces Colourful Message Bubbles in Latest Update : व्हॉट्सॲपने आणखी एकदा आपल्या यूजर्सना खुश करण्याची तयारी केली आहे.अलीकडच्या बीटा व्हर्जनमध्ये दिसून आलेल्या नव्या फीचरनुसार लवकरच व्हॉट्सॲपवर भन्नाट फीचर येणार आहे.
WhatsApp’s New Chat Theme and Colour Options Set for Release
WhatsApp’s New Chat Theme and Colour Options Set for Releaseesakal
Updated on

WhatsApp Chat Bubble Theme Feature : व्हॉट्सॲप आपल्या वापरकर्त्यांसाठी नेहमीच काही ना काही नवीन फीचर्स घेऊन येत असते.त्यामध्ये व्हॉइस स्टेटस,फेवरेट चॅट,मेटा एआय सारखी कृत्रिम बुद्धिमत्तेची सुविधा आणि बरेच फीचर्स व्हॉट्सॲपने आणले आहेत. भविष्यातही अनेक नवीन पिक्चर सांगण्याच्या मार्गावर आहे अशात जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपने आणखी एकदा आपल्या यूजर्सना खुश करण्याची तयारी केली आहे.

अलीकडच्या बीटा व्हर्जनमध्ये दिसून आलेल्या नव्या फीचरनुसार लवकरच व्हॉट्सॲपवर चॅट बबल रंगीबेरंगी होणार आहेत.

व्हॉट्सॲपच्या सेटिंग्जमध्ये लवकरच एक नवा पर्याय उपलब्ध होणार आहे ज्यामुळे वापरकर्ते आपल्या आवडीच्या रंगाचे चॅट बबल निवडू शकतील. यामुळे ॲपचा लूकही बदलणार आहे. मात्र, या नव्या फीचरबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.

WhatsApp’s New Chat Theme and Colour Options Set for Release
Digital Detox : लाँग विकेंडच्या सुट्टीचा प्लॅन करताय? एकदा करून पाहाच डिजिटल डिटॉक्स,फायदे जाणून व्हाल शॉक

दरम्यान, व्हॉट्सॲप लवकरच आपल्या ॲपमध्ये आणखी काही नवीन फीचर्स आणि रिफ्रेश्ड इंटरफेसही आणणार आहे. यातील सर्वात मोठा बदल म्हणजे व्हॅरिफिकेशन टिक मार्कचा रंग हिरवाऐवजी निळा होणार आहे.

WhatsApp’s New Chat Theme and Colour Options Set for Release
Redmi New Smartphone : Redmiच्या ब्रँड स्मार्टफोनची भारतात एंट्री; 7000 रुपयांपेक्षा कमी किंमत,फीचर्स अन् कॅमेराही एकदम खास

याआधी व्हॉट्सॲपवर सत्यापित बिझनेस अकाउंट्सना हिरवा बॅज दिसायचा. मात्र, आता हा रंग बदलून निळा करण्यात येणार आहे. यामुळे व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक या सर्वच प्लॅटफॉर्मचा लूक एकसारखा होणार आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना कोणत्याही प्लॅटफॉर्मवर सत्यापित बिझनेस अकाउंट्स सहज ओळखता येतील.

WhatsApp’s New Chat Theme and Colour Options Set for Release
Oneplus Smartphone Sale : खुशखबर! वनप्लसच्या 'या' ब्रँड स्मार्टफोनवर मिळतोय चक्क 11 हजारांचा डिस्काउंट,एकदा बघाच

हे फीचर सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.हिरव्या रंगाचा बॅज दिसल्यानंतर ते प्लॅटफॉर्म विश्वासार्ह आहे,हे स्पष्ट होईल. या नव्या अपडेटबद्दल सध्या जास्त माहिती उपलब्ध झालेले नाही. पण काही दिवसांमध्ये पुढच्या अपडेटसह हे नवे फीचर्स म्हणजेच व्हॉट्सॲप चॅट बबल थीम आणि व्हॉट्सॲप बिजनेस अकाउंटमधील बॅजचा रंग बदलण्याचे फीचर लवकरच आपल्या फोनमध्ये येईल.

या नव्या फीचर्समुळे व्हॉट्सॲपचा वापर आणखी मनोरंजक होणार आहे यात शंका नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.