व्हॉट्सअ‍ॅपचे दिवाळी गिफ्ट; 1 रुपया पेमेंट करा अन् मिळवा 51 कॅशबॅक

whatsapp pay
whatsapp paySakal
Updated on

WhatsApp Pay cashback offer : कंपनीने त्यांची UPI आधारित पेमेंट सर्व्हिस नुकतीच सुरु केली असून ती प्रमोट करण्य़ासाठी WhatsApp या दिवाळीत सर्व ग्राहकांसाठी खा गीफ्ट घेऊन आलं आहे. वापरकर्त्यांना Whatsapp pay वापरुन केलेल्या प्रत्येक पेमेंटवर कंपनीकडून 51 रुपयांचा कॅशबॅक देण्यात येत आहे आणि याची खास गोष्ट म्हणजे तुम्ही एखाद्याला या WhatsApp Pay ने किती पैसे पाठवत आहात यावर कोणतीही बंधन नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या मित्राला अक्षरशः 1 रुपये देऊन 51 रुपये परत मिळवू शकता.

तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या कॉन्टॅक्ट्सला पैसे पाठवून 51 रुपयांचा पाच वेळा गॅरंटीड कॅशबॅक मिळवू शकता. ही पैसे कमवण्याची ऑफर सध्या अँड्रॉयड बीटा युजर्संसाठी रोल आउट करणे सुरू केले आहे. या व्हॉट्सअॅप ऑफरचा लाभ घेणार्‍या वापरकर्त्यांना तब्बल 255 रुपये मिळू शकतात, कारण ही ऑफर पहिल्या पाच व्यवहारांसाठी देण्यात आली आहे. प्रत्येक पाच व्यवहारांसाठी तुम्हाला प्रति व्यवहार 51 रुपये मिळतील. ही रक्कम तुम्ही WhatsApp पे सर्व्हिसमध्ये रजिस्टर केलेल्या तुमच्या बँक खात्यात रक्कम थेट जमा केली जाईल. ऑफर सध्या फक्त Android डिव्हाइसवर देण्यात आली आहे

whatsapp pay
या आहेत हायटेक फीचर्स असलेल्या देशातील सर्वात स्वस्त SUV कार

WhatsApp पे कॅशबॅक ऑफर

व्हॉट्सअ‍ॅप पे सेवेची भारतात सुरुवात झाल्यानंतर ही सेवा प्रमोट करण्यासाठी कंपनीकडून ही ऑफर देण्यात येत आहे. WhatsApp Pay ला आता बरेच महिने झाले आहेत पण त्याचा वापर करणारे फारसे वाढले त्यामुळेच WhatsApp आपल्या प्लॅटफॉर्मवर अधिक वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी Google Pay ही पध्दत वापरत आहे.

काही वर्षांपूर्वी, Google Pay ने देखील अशाच स्वरुपाची ऑफर ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी वापरल्या होत्या. आता देखील Google Pay प्रत्येक व्यवहारावर स्क्रॅच कार्ड सारखे बक्षीस देत असते, त्यापैकी काहींनी काही प्रमाणात कॅशबॅक मिळते, तर काहींनी कूपन आणि इतर स्वरूपाची बक्षिसे दिली जातात. PhonePe देखील अधिकाधिक वापरकर्त्यांना त्याच्या प्लॅटफॉर्मवर आकर्षित करण्यासाठी अशाच प्रकारच्या कॅशबॅक ऑफर करते.

whatsapp pay
देशातील सर्वात दमदार Pulsar लॉंच, पाहा किंमत-फीचर्स

WhatsApp Pay कसे सेट करावे

- कोणत्याही व्हॉट्सअॅप चॅटमध्ये टेक्स्ट फील्डवर "Re" चिन्हावर क्लिक करा.

- पेमेंट मेथड जोडण्यासाठी WhatsApp तुम्हाला एक नोटीफिकेशन पाठवेल, ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.

- बँकांच्या लिस्टमधून तुमची बँक निवडा.

- तुमचा व्हॉट्सअॅप नंबर आणि तुमचा बँकेकडे रजिस्टर्ड मोबाईल नंबर हा सारखाच आहे याची देखील तुम्हाला खात्री करावी लागेल.

- पुढे गेल्यावर, व्हेरिफीकेशनसाठी तुमच्या नंबरवर एसएमएस पाठवला जाईल.

- तुमच्याकडे आधीच UPI पिन असल्यास, तुम्हाला फक्त तो एंटर करावा लागेल आणि तुमची सेवा सक्रिय होईल. तुम्ही पहिल्यांदा UPI वापरत असल्यास, तुम्हाला नवीन पिन सेट करणे आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()