WhatsApp premium : आता एकाच नंबरवरून चालवता येणार १० व्हॉट्सअॅप अकाऊंट्स

प्रीमियम सबस्क्रिप्शन अंतर्गत, बिझनेस अॅप वापरकर्त्याला कॉन्टॅक्ट लिंक कस्टमाइझ करण्याचा पर्याय मिळेल.
WhatsApp premium
WhatsApp premium google
Updated on

मुंबई : तुम्हीही WhatsApp Business अॅप वापरत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. व्हॉट्सअॅपने व्यवसाय अॅपच्या वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सअॅप प्रीमियम सबस्क्रिप्शन सुरू केले आहे. त्याचे अपडेट सध्या केवळ काही वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.

व्हॉट्सअॅप प्रीमियमच्या अपडेटचा बीटा युजर्ससाठी जारी करण्यात आला आहे. व्हॉट्सअॅपच्या फीचर्सचा मागोवा घेणाऱ्या WABetaInfo ने या फीचरची माहिती दिली आहे. बीटा वापरकर्ते त्यांच्या अॅपमध्ये प्रीमियम मेनू पाहू शकतात. वापरकर्त्यांना प्रीमियम मेनूमध्ये अनेक अतिरिक्त वैशिष्ट्ये मिळतील. (WhatsApp premium)

WhatsApp premium
जेवल्यानंतर कुटुंबाने तिथेच टाकला कचरा आणि मग काय झाले पाहा...

प्रीमियम सबस्क्रिप्शन फक्त बिझनेस अॅपसाठी आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही सामान्य वापरकर्ता असाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. प्रीमियम सबस्क्रिप्शन अंतर्गत, बिझनेस अॅप वापरकर्त्याला कॉन्टॅक्ट लिंक कस्टमाइझ करण्याचा पर्याय मिळेल.

प्रीमियम अपडेट आऊट झाल्यावर, फोन नंबर टाइप न करता व्यवसाय खात्याशी जोडला जाऊ शकतो. टेलीग्राममध्ये आधीपासूनच असेच वैशिष्ट्य आहे. वापरकर्त्यांना प्रीमियम सबस्क्रिप्शनसाठी पैसे द्यावे लागतील. याचा फायदा असा होईल की तुम्ही एकाच नंबरवरून 10 डिव्हाइसेसमध्ये एकच खाते वापरू शकता. याशिवाय 32 लोक एकाच वेळी व्हिडिओ कॉल करू शकतील.

WhatsApp premium
सोशल मीडियावर '१ हजार'साठी '1t'ऐवजी '1k' का लिहिले जाते ?

कॉल लिंक फीचर देखील येत आहे

काही दिवसांपूर्वी मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी सांगितले होते की व्हॉट्सअॅप झूम आणि गुगल मीट सारख्या व्हिडिओ कॉलिंग लिंक्स शेअर करण्याच्या फीचरसह येत आहे. या लिंकच्या मदतीने कोणीही ग्रुप कॉल किंवा मीटिंगमध्ये सहभागी होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.