नागपूर : व्हॉट्सॲप (WhatsApp) ही सध्याच्या काळातील जगातील सर्वात लोकप्रिय संदेशन प्रणाली झाली आहे. ज्यामार्फत स्मार्टफोनद्वारे आपण इंटरनेट वापरून दुसऱ्या व्हॉट्सॲप वापरकर्त्याला त्वरित संदेश पाठवता व वाचता येतो. संदेशासोबत चित्रे, गाणी, व्हिडियो व इतर प्रकारच्या फाईल्स देखील एकमेकांसोबत शेअर करता येतात. व्हॉट्सॲपद्वारे नवीन अपडेशन करण्यात येते. आता व्हॉट्सॲप असे अपडेशा घेऊन येणार आहे, ज्याद्वारे मोठी समस्या सुटेल. चला तर जाणून घेऊया आगामी अपडेट्समध्ये येणाऱ्या फिचर विषयी...
व्हॉट्सॲप वापरकर्त्यांचे प्रमाण जगभरात दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. भारतातही मोठ्या प्रमाणात व्हॉट्सॲपचे युजर्स मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ज्याच्याकडे स्मार्टफोन आहे ते व्हॉट्सॲप वापरल्याशिवाय राहत नाही. व्हॉट्सॲप न वापरणार क्वचितच आढळून येईल. व्हॉट्सॲपचा वाढती लोकप्रियता पाहून फेसबुकचा मालक मार्क झुकेरबर्ग घाबरून गेला होता. युजर्स फेसबुककडे पाठ फिरवेल या भीतीपोटी मार्क झुकेरबर्गने व्हॉट्सॲपला २०१४ साली विकत घेतले होते.
व्हॉट्सॲपची निर्मिती २००९ साली झाली. ब्रायन ॲक्टन व जॅन कोम या दोन अमेरिकन व्यक्तींनी याची निर्मिती केली होती. कॅलिफोर्नियाच्या माउंटन व्ह्यू या शहरामध्ये व्हॉट्स ॲपचे मुख्यालय आहे. मार्क झुकेरबर्ग हे सध्या व्हॉट्सॲप या कंपनीचे मालक आहे. भारतासह जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून व्हॉट्सॲपकडे पाहिले जाते. वापरकर्त्यांना नेहमीच नवनवीन फीचर्स देण्यासाठी व्हॉट्सॲप प्रयत्नशील असते. आताही व्हॉट्सॲप ॲण्ड्रॉईड वापरकर्त्यांसाठी नवा फिचर घेऊन येत आहे.
नवीन फिचरमध्ये एखाद्या व्यक्तीला पाठवलेले चॅटवरील फोटो, व्हिडिओ आणि जीफ फाइल्स पाठवल्यानंतरही डिलीट करता येणार आहे. म्हणजेच अगदी सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास चॅट करताना मिडिया फाइल्स पाठवल्यानंतर आणि डिलेव्हर झाल्यानंतरही समोरच्या व्यक्तीच्या व्हॉट्सॲप चॅटमधून या फाइल्स डिलीट करण्याची सोय व्हॉट्सअॅप उपलब्ध करून देणार आहे.
जगभरामध्ये २०० कोटींहून अधिक अॅक्टीव्ह युझर्स असलेले व्हॉट्सअॅप हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. त्यामुळेच फेसबुकच्या मालकीच्या मेसेजिंग अॅपमध्ये नवीन फिचरचा समावेश करताना अधिक वेळ लागतो. कारण, नवीन फिचरचा समावेश करताना त्यामध्ये बग (तांत्रिक अडचण) आल्यास त्याचा परिणाम सर्वच युझर्सवर होतो. सामान्यपणे एखादे फिचर आणताना व्हॉट्सअॅप ते काही महिन्यांसाठी मर्यादित बिटा व्हर्जन युझर्सला वापरण्यासाठी देते. त्यानंतर त्यामध्ये वेळोवेळी सुधारणा करून अंतिम अपडेटेड फिचर युझर्सला वापरायला मिळते.
नवीन फिचरला फिचर एक्पायरिंग (म्हणजेच नष्ट होणारं) मीडिया फिचर असे म्हटले जात आहे. व्हॉट्सअॅप संदर्भातील माहिती देणाऱ्या वाबिटाइन्फो या वेबसाईटला सर्वात आधी हे फिचर आढळून आल्याचे द इन्डीपेंडण्टने म्हटले आहे. चॅटमध्ये मीडिया मेसेज पाहून झाल्यानंतर तो गायब होणारे हे फिचर आहे. एक्पायरिंग मीडिया फिचर वापरण्यासाठी फोटो, व्हिडिओ आणि जीफ चॅट मेसेजमधून पाठवताना ‘व्ह्यू वन्स’ हा पर्याय निवडावा लागणार आहे.
‘व्ह्यू वन्स’ हा पर्याय निवडून पाठवलेल्या फाइल्स समोरच्या व्यक्तीला केवळ चॅट करताना एकदाच दिसतील. चॅट विंडो बंद केल्यानंतर हे मेसेज आपोआप डिलिट होती. ‘चॅट विंडो सोडल्यावर ही फाइल नष्ट होइल’, असा नोटीफिकेशनसहीत हे चॅट दिसतील. चॅट विंडोवर पुन्हा आल्यास पॉप अप नोटिफिकेशनच्या माध्यमातून ‘व्ह्यू वन्स फोटो एक्पायर्ड’ असं युझर्सला नोटीफाय केले जाईल. विशेष म्हणजे या चॅटचे स्क्रीनशॉर्टही काढता येणार नाही.
व्हॉट्सअॅपच्या नवीन अॅण्ड्रॉइड २.२०.२०११ व्हर्जनमध्ये हे नवीन फिचर राहणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या या फिचरवर काम सुरू आहे. व्हॉट्सअॅपच्या बिटा व्हर्जनवर त्याच्या चाचण्या सुरू आहेत. मात्र, सर्व सामान्यांना हे फिचर कधी वापरता येईल यासंदर्भातील निश्चित तारीख सांगण्यात आलेली नाही.
सकलन आणि संपादन - नीलेश डाखोरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.