WhatsApp हे जगभरात वापरले जाणारा मेसेजिंग प्लॅटफॉर्म असून आजकाल जवळजवळ प्रत्येकजण त्याच्या प्रियजनांच्या संपर्कात राहण्यासाठी WhatsApp वापरतो. या अॅपमध्ये कंपनीने वापरकर्त्यासाठी बरेच चांगले फीचर्स दिले आहेत पण काही फीचर्स असे देखील आहेत ज्यांचा वापर स्टॉकर्सकडून काही चुकीच्या कामांसाठी केला जातो. काही लोक एखाद्याला ऑनलाइन फॉलो करण्यासाठी थर्ड पार्टी अॅप्सद्वारे त्याचे 'लास्ट सीन' आणि 'ऑनलाइन' स्टेटस पाहातात.
काही वापरकर्त्यांच्या लक्षात आले असेल की, ज्या वापरकर्त्यांसोबत त्यांनी यापूर्वी चॅट केलेले नाही त्यांचे तुम्ही ते 'ऑनलाइन' आहेत का ते किंवा 'लास्ट सीन' पाहू शकत नाहीत. WABetaInfo रिपोर्टनुसारनुसार, WhatsApp लवकरच थर्ड पार्टी अॅप्लिकेशन्सना टाइम लॉगची एक्सेस रोखण्यासाठी एक नवीन फीचर इंटीग्रेट करत आहे.
Android च्या गुगल प्ले स्टोअर आणि आयओएसच्या अॅप्पल प्ले स्टोअरवर असे थर्डपार्टी अॅप आहेत ज्यांच्या मदतीने 'ऑनलाईन' स्टेटस टाईम आणि एखाद्याचे लास्ट सीन टाइम पाहता येते अशा अॅप्स WhatsApp डेटा ट्रॅक करण्यासाठी केला जाऊ शकतो. अशा अॅप्सना असा डेटा मिळू नये यासाठी व्हॉट्सअॅपने आता काही सुरक्षा उपाय सुरू केले आहेत.
दोन्ही प्रकारच्या WhatsApp अकाउंटमध्ये तुमचे लास्ट सीन स्टेटस अॅक्टीव्ह असताना देखील, एखाद्यासोबत कुठलीही चॅट हिस्ट्री असल्याशिवाय ते इतर वापरकर्त्यांना ते दिसणार नाही. ऑनलाइन आहात का हे देखील दिसणार नाही. व्हॉट्सअॅपने आश्वासन दिले आहे की, ही नवीन नियामांमुळे वापरकर्त्यांना चॅट करताना मित्र, कुटुंबिय आणि व्यवसायासंबंधीत व्यक्तिंशी चॅट करताना कोणताही अडथळा येणार नाही.
WhatsApp ने सांगीतले की, त्यांच्याकडून वापरकर्त्यांची प्रायव्हसी आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी, तसेच वापरकर्त्यांना ओळखत नसलेले लोक आणि ज्यांच्याशी कधीच व्हॉट्सअॅपवर चॅट केली नाही, असे लोक वापरकर्त्यांचे लास्ट सीन आणि ऑनलाईन स्टेटस पाहू शकणार नाहीत. चॅट केल्यानंतर देखील तुम्ही लास्ट सीन आणि ऑनलाइन स्टेटस पाहू शकत नसल्यास, तुमच्या कॉन्टॅक्टने त्यांचे स्टेटस सर्वांसोबत शेअर करणे बंद केले आहे किंवा फक्त काही विशिष्ट वापरकर्त्यांना त्यांची ते पाहण्याची परवानगी दिली आहे असा होतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.