Whatsapp Update : व्हॉट्सॲप नेहमीच त्यांच्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर्स आणि अपडेट घेऊन येत असतात.कधीकधी ते लोकांच्या पसंतीस उतरतात तर कधी कधी त्याला नाकारलं पण जातं. पण यावेळी व्हाट्सअपने एक असं भन्नाट फिचर आणलेलं आहे ज्याची वापरकर्ते खूप वेळापासून प्रतीक्षा करत होते.
व्हॉट्सॲप लवकरच डेस्कटॉप अॅपवरून स्टेट्स अपडेट करण्याची सुविधा आणत आहे. आत्तापर्यंत फक्त मोबाईल अॅपवरूनच स्टेट्स अपडेट करता येत होते. पण आता डेस्कटॉपवरूनही थेट स्टेट्स शेअर करणे शक्य होणार आहे. विशेषत: ज्यांचं काम संगणकावर असतं त्यांच्यासाठी ही खूप उपयुक्त सुविधा आहे.
Mac वापरणाऱ्यांसाठी ही सुविधा आधीच बीटा टेस्टिंगमध्ये आहे. लवकरच इतर वापरकर्तेही याचा लाभ घेऊ शकणार आहेत. या नवीन फीचरमुळे तुम्ही थेट तुमच्या मॅकवरील स्टेट्स टॅबमधून स्टेट्स अपडेट करू शकाल. म्हणजेच, जसं तुम्ही मोबाईलवर करता तसं तुम्ही टेक्स्ट किंवा फोटो स्टेट्स शेअर करू शकाल.
आधी फक्त डेस्कटॉप अॅपवरून स्टेट्स पाहता येत होते, पण आता त्यावर अपडेट्स देता येणार आहेत. यामुळं तुम्हाला आता फोन आणि डेस्कटॉप दरम्यान वळण करावं लागणार नाही. त्याचबरोबर, तुमचा फोन बंद असला तरी किंवा इंटरनेटशी कनेक्ट नसला तरीही स्टेट्स अपडेट करता येणार आहेत.
याशिवाय, व्हॉट्सॲपने नुकतंच स्टेट्सवर व्हॉइस नोट्सची वेळ मर्यादा वाढवली आहे. आता तुम्ही 1 मिनिटाचा व्हॉइस नोट स्टेट्सवर अपलोड करू शकतात. त्यामुळं आता तुम्ही अधिक माहिती आणि लांबीच्या गोष्टी सहजतेने शेअर करू शकाल.
एकंदरीत, व्हॉट्सॲप डेस्कटॉपवरून स्टेट्स अपडेट करणे आणि वाढीव व्हॉइस नोट वेळ ही खासियत वापरकर्त्यांच्या सोयीसाठी आहे. यामुळं व्हॉट्सॲपचा अनुभव अधिक इंटरेस्टिंग होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.