Whatsapp Spam Message Blocker : व्हॉट्सअ‍ॅपवर येणारे स्पॅम मेसेज आपोआप होणार ब्लॉक; नवीन फीचर कसं वापराल?

Whatsapp Spam Message Blocking Feature : व्हॉट्सअ‍ॅप लवकरच असे एक खास फीचर आणणार आहे ज्यामुळे तुमच्या फोनवर अनोळखी नंबरवरून येणारे स्पॅम मेसेजेस थांबवता येणार आहेत.
Whatsapp Spam Auto Blocker Feature
Whatsapp Spam Auto Blocker Featureesakal
Updated on

Whatsapp New Feature : लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. व्हॉट्सअ‍ॅप लवकरच असे एक खास फीचर आणणार आहे ज्यामुळे तुमच्या फोनवर अनोळखी नंबरवरून येणारे स्पॅम मेसेजेस थांबवता येणार आहेत. या फीचरमुळे तुमच्या इनबॉक्समध्ये फक्त आवश्यक मेसेजेसच दाखवले जातील.या फीचरमुळे स्पॅम मेसेजचा त्रास कमी होणार आहे.

कोणत्या प्रकारे काम करेल हे फीचर?

सध्या हा फीचर अँड्रॉइडवरच्या व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये चाचणीच्या टप्प्यात आहे. या फीचरमध्ये तुम्ही किती अनोळखी नंबरवरच्या मेसेजेसची मर्यादा तुम्ही ठरवू शकता. जर एखाद्या अनोळखी नंबरवरून या मर्यादेपेक्षा जास्त मेसेजेस आले तर व्हॉट्सअप त्या नंबरवरून येणारे पुढील मेसेजेस स्वतःच ब्लॉक करेल. यामुळे तुमच्या फोनच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसलेल्या आणि तुम्हाला त्रास देणाऱ्या नंबरवरून येणारे मेसेजेस थांबवता येणार आहेत.

Whatsapp Spam Auto Blocker Feature
Whatsapp Custom Lists : कोट्यवधी व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना मिळाले आणखी एक खास फीचर,आता शोधावे लागणार नाहीत बाबू-शोनाचे चॅट्स

कसे वापरायचे हे फीचर?

आत्ता हा फीचर फक्त अँड्रॉइड बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. जर तुम्ही अँड्रॉइडवर व्हॉट्सअपचे बीटा व्हर्जन वापरत असाल तर तुम्ही खालीलप्रमाणे हे फीचर चालू करू शकतात-

  • सेटिंग्ज (Settings) मध्ये जा.

  • 'प्रायव्हसी' (Privacy) वर क्लिक करा.

  • 'अॅडव्हान्सड' (Advanced) वर क्लिक करा.

  • येथे तुम्हाला 'कॉलमध्ये आयपी ॲड्रेस प्रोटेक्ट करा' (Protect IP address in calls) या फीचरच्या वर 'अनोळखी अकाउंट्स ब्लॉक करा' (Block unknown accounts) हा पर्याय दिसेल.

Whatsapp Spam Auto Blocker Feature
IRCTC Ticket Reservation : रेल्वेचे अ‍ॅडवांस बुकिंग होणार फक्त 60 दिवस आधी,कोणत्या प्रवाशांवर होणार परिणाम? जाणून घ्या

कधी उपलब्ध होईल हे फीचर?

आत्ता हे फीचर अँड्रॉइडवर चाचणीच्या टप्प्यात आहे पण लवकरच तो iOSसाठीही उपलब्ध होण्याची शक्यता आहे. अजून व्हॉट्सअपने या फीचरच्या अधिकृत रिलीजची तारीख जाहीर केलेली नाही पण तो या वर्षाच्या अखेरीस रोलआउट होण्याची शक्यता आहे.

Whatsapp Spam Auto Blocker Feature
Traffic Fine On Whatsapp : व्हॉट्सअ‍ॅपवरून मिनिटांत भरता येणार वाहतूक दंड, नेमकं कसं? पाहा एका क्लिकमध्ये..

व्हॉट्सअपमधील इतर फीचर्स

स्पॅम ब्लॉकिंग व्यतिरिक्त व्हॉट्सअपने आणखी एक नवीन एआय-आधारित फीचर आणले आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे स्वतःचे स्टिकर्स बनवू शकता. अ‍ॅटॅचमेंट सेक्शनमध्ये उपलब्ध असलेल्या 'इमॅजिन' (Imagine) टूलचा वापर करून तुम्ही मेटा एआयला आदेश देऊन एआय स्टिकर्स बनवू शकता.

हे सतत येणारे अपडेट्स व्हॉट्सअपच्या युजर चांगल्या अनुभवावर भर देण्याचा कंपनीचा प्रयत्न दाखवतात. या फीचर्समुळे वापरकर्त्यांना सुरक्षा आणि क्रिएटिव्ह टूल्स दोन्ही गोष्टी मिळणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.