Whatsapp New AI Feature : व्हॉट्सॲपच्या मेटा एआयमध्ये नव्या फीचरची एंट्री! टायपिंग करायची झंझटच संपणार, जाणून घ्या कसं वापरायच हे फीचर

Whatsapp Meta AI Feature : व्हॉट्सॲपने आपल्या चॅटबॉट मेटा एआयला आणखी स्मार्ट बनवण्याच्या दिशेने पुढे वाटचाल केली आहे. लवकरच चॅटबॉटला नवीन अपडेट मिळणार आहे.
Voice Conversations with Meta AI WhatsApp's Latest Beta Feature
Voice Conversations with Meta AI WhatsApp's Latest Beta Featureesakal
Updated on

Whatsapp Meta AI : व्हॉट्सॲप आपल्या वापरकर्त्यांसाठी नेहमीच नवनवीन फीचर्स घेऊन येत असते. व्हॉट्सॲपने मेटा एआय, व्हॉइस स्टेटस, एडिटिंगसाठी इमेज मी आणि फेवरेट चॅटसाठी देखील वेगवेगळे फीचर्स आणले आहेत. त्याचबरोबर व्हॉट्सॲपचे फोटो एचडी क्वालिटीने पाठवण्यासाठी देखील विचार लॉन्च केले आहे .

थोडक्यात, व्हॉट्सॲप त्यांच्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन सुविधा देऊन व्हॉट्सॲप वापरण्याचा त्यांचा अनुभव अधिकच चांगला करण्याचा प्रयत्न करत आहे. अशात व्हॉट्सॲपने आपल्या चॅटबॉट मेटा एआयला आणखी स्मार्ट बनवण्याच्या दिशेने पुढे वाटचाल केली आहे. लवकरच तुम्ही या एआयशी आवाजात चॅट करू शकणार आहात, अशी माहिती समोर आली आहे.

व्हॉट्सॲपच्या काही रिपोर्टच्या अनुसार, कंपनी सध्या व्हॉट्सॲपच्या अँड्रॉइड आवृत्तीवर एक नवीन फीचर चाचणी पातळीवर आहे. या फीचरमुळे वापरकर्ते मेटा एआयला आवाजात संदेश (voice message) पाठवू शकतील. या आवाज संदेशाचे विश्लेषण करून मेटा एआय त्यानुसार लिखित उत्तरे देईल.आता तुम्हाला हव्या असणाऱ्या माहितीसाठी तुम्हाला चॅटबॉटवर टायपिंग करत बसण्याची गरज लागणार नाही.

Voice Conversations with Meta AI WhatsApp's Latest Beta Feature
Whatsapp AI : व्हॉट्सॲपमधली मेटा एआयची ब्ल्यू रिंग झाली गायब; आता कसं वापरणार AI?

सध्या ही सुविधा फारच कमी वापरकर्त्यांना उपलब्ध करून देण्यात आली असून येत्या काळात सर्व वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या नव्या फीचरमुळे मेटा एआय वापरकर्त्यांना खूप माहिती शोधणे किंवा एआयच्या माध्यमातून काहीही करणे खूपच सोयीचे ठरणार आहे. कारण, बरेचदा आपल्याला लांबच लांब प्रश्न विचारायचे असतात, त्यावेळी टाइपिंग करण्यापेक्षा आवाजात विचारणे अधिक सोपे जाईल.

Voice Conversations with Meta AI WhatsApp's Latest Beta Feature
Instagram AI Tips : इंस्टाग्रामवर आलंय स्टोरी बॅकग्राऊंड चेंज फिचर,कसं वापराल? जाणून घ्या

दरम्यान, व्हॉट्सॲपने आपल्या ॲपवर आणखी एक नवीन फीचरही चाचणी पातळीवर आणले आहे. त्यानुसार, कोणताही संदेश डबल टॅप केल्यावर त्याला आपोआप हृदयाचे इमोजी (heart emoji) लागेल. हा फीचरही लवकरच सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

असे म्हणता येईल की, व्हॉट्सॲप आपल्या वापरकर्त्यांना आणखी चांगली आणि सोपी सेवा देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.