Whatsapp Colour Feature : गुलाबी,निळा की जांभळा ? रंगीत होणार व्हॉट्‌सॲपचं चॅट.. लवकरच येतोय नवीन फीचर

Whatsapp Update : व्हॉट्सॲपच्या iOS बीटा व्हर्जनवर या फीचरची चाचणी सुरू
Personalize Your Chats with WhatsApp’s New Theme Customization Feature
Personalize Your Chats with WhatsApp’s New Theme Customization Featureesakal
Updated on

Whatsapp Colour Feature : व्हॉट्‌सॲप त्यांच्या वापरकर्त्यांसाठी नेहमीच काहीतर नवीन करण्याचा प्रयत्न करत असते. याच प्रयत्नातून कंपनी चॅटसाठी थीम कस्टमायझेशन फीचरवर काम करत आहे. या फीचरमुळे वापरकर्ते त्यांच्या आवडीनुसार चॅटचा डिफॉल्ट थीम सेट करू शकतील.

आत्तापर्यंत आपण WhatsApp वर फक्त दोनच रंगीत थीम पाहत होतो, नियमित मोड किंवा डार्क मोड. पण आता आपल्याला आवडीनुसार वेगवेगळ्या रंगांच्या थीम निवडता येणार आहेत. याशिवाय यूजर्स चॅट बबलचा रंगही बदलू शकतील.

सध्या व्हॉट्सॲपच्या iOS बीटा व्हर्जनवर या फीचरची चाचणी सुरू आहे. हे वैशिष्ट्य iOS बीटा व्हर्जन 24.11.10.70 मध्ये पाहिले गेले आहे, जे हळूहळू सर्व वापरकर्त्यांसाठी आणले जाईल.

Personalize Your Chats with WhatsApp’s New Theme Customization Feature
Whatsapp New Feature : व्हॉट्सअपने व्हॉइस स्टेटसचं फिचर केल अपग्रेड,आता वाढणार टाईम लिमिट

आतापर्यंत व्हॉट्सअँप फक्त चॅट वॉलपेपर बदलण्याची सुविधा होती. त्यातही काही निवडलेले सॉलिड कलर्स आणि डार्क/लाइट थीम आहेत. इतकेच नाही तर व्हॉट्‌सॲप डिफॉल्ट वॉलपेपरवरील डूडलची स्पष्टता वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी स्लाइडर आहे. तसेच कॅमेरा रोलमधून फोटो निवडून चॅट वॉलपेपर म्हणून सेट करण्याचीही सोय आहे.

WABetaInfo नुसार, हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला तुमच्या WhatsApp खात्याच्या सेटिंग्जमध्ये जावे लागेल, येथे तुम्हाला चॅटचा पर्याय दिसेल. जेव्हा तुम्ही येथे क्लिक कराल तेव्हा वापरकर्त्याला थीम पर्यायावर क्लिक करावे लागेल.

यानंतर व्हॉट्सॲप यूजरला डिफॉल्ट चॅट थीमचा पर्याय दिसेल. तुम्ही येथे कोणताही रंग निवडाल, ती डीफॉल्ट चॅट थीम बनेल.

Personalize Your Chats with WhatsApp’s New Theme Customization Feature
Mobile Charging : मोबाईलच चार्जिंग टिकत नाही? वापरुन पहा या सोप्या टिप्स

जेव्हा तुम्ही ही थीम बदलता, तेव्हा तुमच्या चॅट बॅकग्राऊंड आणि चॅट बबल या दोन्हींचा रंग बदलेल. मिळालेल्या माहितीनुसार, ॲप यूजर्सना पाच कलर ऑप्शन देऊ शकते. यामध्ये हिरवा, निळा, पांढरा, गुलाबी आणि व्हायलेट या रंगांचा समावेश आहे. नंतर त्यात आणखी रंग जोडता येतील.

व्हॉट्‌सॲप वापरकर्ते बराच काळापासून चॅट बबल कस्टमायझ करण्याची सुविधा मागत होते. व्हॉट्‌सॲपला कलरफुल बनवणारं हे फिचर नक्कीच लोकांच्या पसंतीस उतरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com