Whatsapp Dialer : नंबर सेव्ह करण्याची गरज नाही, थेट करा कॉल; व्हॉटसअ‍ॅपचं नवं अपडेट आलंय; फिचर्स जाणून घ्या

Whatsapp Update : व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असते. लवकरच एक नवीन इन-अॅप डायलर येणार आहे.
Whatsapp In-Dailer Feature
Whatsapp In-Dailer Featureesakal
Updated on

Whatsapp Feature : व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असते. हल्ली त्यांनी अनेक फीचर्स लॉंच केले आहेत. ज्यामध्ये बॅकग्राऊंड चेंज,वॉइस स्टेटस वेळेत वाढ, AR फीचर असे अनेक अपडेटेड फीचर आणले. अजून एक आनंदाची बातमी देत व्हॉट्सअ‍ॅपने पुढील अपडेटमध्ये अजून एक नवीन फीचर लॉंच करण्याची घोषणा केली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर लवकरच एक नवीन इन-अॅप डायलर येणार आहे. याचा अर्थ आता तुम्हाला एखाद्याला कॉल करायचा असेल आणि तो नंबर तुमच्या फोनबुकमध्ये नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. थेट व्हॉट्सअ‍ॅपवरच तुम्ही नंबर डायल करून कॉल करू शकणार आहात.

हे नवीन फीचर अँड्रॉइड बीटा युजर्ससाठी आधीच टेस्टिंगमध्ये आहे. याचा अर्थ लवकरच हे फीचर सर्व व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी उपलब्ध होईल. यामुळे आता एखाद्याला कॉल करण्यासाठी त्यांचा नंबर फोनमध्ये सेव्ह करण्याची झंझट वाचणार आहे.

Whatsapp In-Dailer Feature
Sunita Williams Trapped :सुनीता विल्यम्स अडचणीत! अंतराळातच अडकल्या; नासाकडून परतीसाठी प्रयत्न सुरु, जाणून घ्या काय आहे कारण

या इन-अॅप डायलरमध्ये तुम्हाला नंबर टाईप करण्यासाठी जागा मिळेल. तसेच नंबर डायल करण्यासाठी आणि कॉल एंड करण्यासाठी बटन्स देखील असतील. इतकेच नाही तर, त्या विशिष्ट नंबरवर व्हॉट्सअ‍ॅप असल्यास एक मेसेजिंगचा पर्याय देखील असेल. म्हणजेच कॉल करायचा की मेसेज करायचा हा निर्णय तुम्ही सहज घेऊ शकणार.

Whatsapp In-Dailer Feature
AI Model Launch : चॅट जीपीटी आणि जेमिनीचे दिवस संपले? 'हे' नवीन AI मॉडेल देणार टक्कर,जाणून घ्या

या फीचरमुळे कॉलिंगचा अनुभव अधिक सुखद होणार आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर कॉल करणे आणखी सोपे होईल. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपच्या या नवीन फीचरची आतुरतेने वाट पाहाण्यासारखी गोष्ट आहे!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.