Whatsapp : व्हाट्सअप त्यांच्या वापरकर्त्यांसाठी नेहमीच नवीनतम फिचर घेऊन येत असतं . पण यावेळीच फिचर अगदी खास आणि कृत्रिम बुध्दीमत्तेशी संबंधित आहे. या नवीन फीचरच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर करून प्रोफाइल फोटो तयार करू शकता येणार आहे. हे फीचर अजून परीक्षणाच्या टप्प्यात असून फक्त काही Android बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध आहे.
वॉश्टाब इन्फोच्या वृत्तानुसार, नवीन बीटा व्हर्जनमध्ये सेटिंग्जमध्ये एक नवीन पर्याय दिसून येतोय ज्याला "Create AI Profile Picture" असे म्हणतात. इथेच मजेशीर भाग सुरू होतो. तुम्ही तुमच्या मनातल्या वर्णनानुसार एआय टूलला एखादीही इमेज बनवायला लावू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही स्वतःचा फोटो न वापरता एखादा कार्टून, एखाद्या ठिकाणाचा फोटो किंवा तुमच्या आवडीचे प्रोफाइल फोटो वापरू शकता.
यामुळे तुमच्या खऱ्या फोटोचा वापर न करता एखादा वेगळा आणि आकर्षक प्रोफाइल फोटो वापरण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना एका तज्ज्ञाने सांगितले की, "AI चा वापर करून बनवलेले प्रोफाइल फोटो हे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे, आवडीचे आणि मूडचे अधिक एकत्रितपणे वर्णन करतील."
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे व्हॉट्सअँपने अजून एक सुरक्षा फिचर ऍड केलेले आहे. तुम्ही इतर लोकांचे प्रोफाइल फोटो, फोटो किंवा व्हिडिओ स्क्रीनशॉट घेऊ शकत नाही.
यापूर्वी व्हॉट्सअँपवर मुख्य स्क्रीनवर एक मुख्य AI चॅटबॉट आला होता. या चॅटबॉटचा वापर करून तुम्ही नवीन रेसिपी शोधू शकता, डेली डायट प्लॅन बनवू शकता आणि अगदी एखाद्या वास्तविक व्यक्तीशी संवाद साधताना प्रश्न विचारू शकता. पण आता येणाऱ्या AI प्रोफाइल फोटो फीचरमुळे व्हाट्सअँपचा वापर अधिक मजेशीर बनणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.