WhatsApp Accounts Banned : व्हॉट्सअ‍ॅची मोठी कारवाई, एका महिन्यात देशातील 71 लाखांहून अधिक अकाउंट्स बॅन

व्हॉट्सअ‍ॅप आणि इतर सोशल मीडिया कंपन्यांना दर महिन्याला आपला रिपोर्ट सादर करावा लागतो.
WhatsApp Accounts Banned
WhatsApp Accounts BannedeSakal
Updated on

व्हॉट्सअ‍ॅपने देशातील तब्बल 71 लाखांहून अधिक अकाउंट्सवर निर्बंध लागू केले आहेत. व्हॉट्सअ‍ॅपने सप्टेंबर महिन्यात ही कारवाई केली होती. यातील कित्येक अकाउंट्स कायमचे बंद करण्यात आले आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप हे जगभरातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप्सपैकी एक आहे. भारतात या अ‍ॅप्सचे 50 कोटींपेक्षा जास्त यूजर्स आहेत. कंपनीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी यातील 71 लाखांहून अधिक अकाउंट्सवर कारवाई करण्यात आली आहे.

WhatsApp Accounts Banned
WhatsApp New Feature : यूट्यूबचं खास फीचर आता व्हॉट्सअ‍ॅपवरही येणार; मोठे व्हिडिओ पाहणं होणार सोपं

व्हॉट्सअ‍ॅप आणि इतर सोशल मीडिया कंपन्यांना दर महिन्याला आपला रिपोर्ट सादर करावा लागतो. या यूजर सिक्युरिटी रिपोर्टमध्ये कंपनीला मिळालेल्या तक्रारी, त्यावर केलेली कारवाई आणि कंपनीने स्वतः केलेली कारवाई याबाबत माहिती द्यावी लागते. यावेळी कंपनीने 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये केलेल्या कारवाईबाबत माहिती दिली आहे. (Tech News)

कंपनीने या महिन्यात एकूण 71,10,000 अकाउंट्सवर कारवाई केली. यांपैकी 25,71,000 खात्यांवर कंपनीने स्वतः कारवाई केली. इतर अकाउंट्सवर मिळालेल्या तक्रारींनुसार कारवाई करण्यात आली. सप्टेंबर महिन्यात कंपनीला 10,442 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यातील 85 टक्के तक्रारींवर कारवाई करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.